
येथील जनसेवा सेवाभावी संस्थेतर्फे अहिल्यानगर व नाशिक सरहद्दीवर असलेल्या विश्रामगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकदिन साजरा झाला.
.
जनसेवेचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात यावेळी छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचे पूजन व दूध व अभिषेक करत महाआरती करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन, अटल फाउंडेशन जिल्हाध्यक्ष रामदास भोर, भाजपच्या भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मुकुंद काकड, भूमी फाउंडेशनचे विनोद नाठी, शिवप्रेमी के. एल. शिंदे, रोहिदास सोनवणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते मावळ्यांच्या व शिवरायांच्या वेशभूषा करत पट्टा किल्ल्यावर चढले. याप्रसंगी शिवरायांच्या जीवनाविषयी माहिती देण्यात आली. शिवप्रेमी किसन शिंदे व राजेंद्र सोनवणे यांनी शिवरायांचे गीत गायले. याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.