
Prashant Koratkar Case: महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा एक फोटो व्हायरल झाला असून या फोटोच्या आधारेच कोरटकर दुबईला पळाल्याचा दावा केला जात आहे. या फोटोमध्ये नेमकं आहे काय ते पाहूयात…
जमीन अर्जावर सोमवारी सुनावणी
प्रशांत कोरटकर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कोल्हापूरच्या सत्र न्यायलयाने नुकताच त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच कोरटकरने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान दिले आहे. दरम्यान, कोरटकरच्या अर्जावर शुक्रवारी तातडीची सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सोमवारीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. असं असतानाच आता कोरटकर पळून गेल्याचा दावा फोटोच्या आधारे केला जात आहे.
कोलताकामार्गे दुबईला पळाला?
कोरटकरच्या व्हायरल फोटोमध्ये तो एका हॉटेलबाहेर उभा असल्याचं दिसत आहे. टी-शर्ट, जीन्स अन् डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये कोरकटकर आहे. हॉटेलचं नाव उर्दूत लिहिलेलं असून हॉटेलबाहेर लावल्या जाणाऱ्या झेंड्यांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा झेंडा दिसत आहे. तसेच कोरकटकर ज्या बसच्या बाजूला उभा आहे त्या बसच्या क्रमाकांवरुन ती दुबईमधील असल्याचं स्पष्ट होत आहे. याच फोटोवरुन कोरकटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकत्तामार्गे कोरटकर दुबईला गेल्याची चर्चा आहे.
नक्की वाचा >> सुरेश धस अडचणीत? ‘खोक्या’ प्रकरणात नार्को टेस्टबरोबरच राजीनाम्याची मागणी; ‘CM फडणवीसांनी…’
घरी जाऊन आले पोलीस
कोल्हापूर पोलिसांचे पाच जणांचे पथक प्रशांत कोरटकरच्या शोधात नागपूरमध्ये दाखल झालं. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर झाल्यानंतर कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच तो पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच गुरुवारी रात्री कोल्हापूर पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकरच्या बेसा येथील निवासस्थानी जाऊन आले. 20 मार्चच्या रात्रीपासूनच प्रशांत कोरटकरचा शोध कोल्हापूर पोलीस घेत आहेत.
पुरावे मिटवल्याचा गुन्हाही दाखल होणार?
कोरटकर याच्या विरोधात पुरावा नष्ट केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत कोरटकरने आपला मोबाईल पोलीसांकडे जमा करताना फॉरमॅट मारल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत असताना मोबाईल फॉरमॅट मारून कोरटकरने चूक केल्याचे निरीक्षण नोंदवल्यानंतर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पुरावा नष्ट केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल होवून प्रशांत कोरटकर यांच्या अडचणी वाढणार आहेत.
नक्की वाचा >> कोकणात राजकीय भूकंप? मोठं नेतृत्व ठाकरेंची साथ सोडून BJP ऐवजी अजित पवारांच्या पक्षात?
कॉल रेकॉर्ड काढून शोध सुरु
कोल्हापूर कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर कोरटकरच्या तपासासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरमध्ये तपास करत आहे. पोलीस कोरटकरच्या मागावर आहेत. कोरटकर ज्यांच्या संपर्कात होता, त्यांच्या कॉल रेकॉर्ड काढून कोरटकरचा शोध सुरू आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.