digital products downloads

शेअर मार्केटच्या कर्जासाठी 73 वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या: 5 वर्षांपासूनच्या भाडेकरूनेच केला विश्वासघात, बार्शीत खळबळ – Solapur News

शेअर मार्केटच्या कर्जासाठी 73 वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या:  5 वर्षांपासूनच्या भाडेकरूनेच केला विश्वासघात, बार्शीत खळबळ – Solapur News



बार्शीतील विशाल फटे याच्या कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याची जखम अजूनही ताजी असतानाच, याच शेअर मार्केटमधील गुंतवणुकीपायी झालेल्या कर्जातून मुक्त होण्यासाठी एका तरुणाने 73 वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याच्या नादात स्वतःला कर्जबाजारी करून बसलेल्या या तरुणाने 73 वर्षीय गंगुबाई गडदे यांना आपल्या घरी बोलावून धारदार शस्त्राने त्यांचा खून केला. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गंगुबाईंचा शोध घेत असताना पोलिस तपासातून हा अंगावर शहारे आणणारा थरार समोर आला असून, या घटनेने संपूर्ण बार्शी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. बार्शी येथील शशिकांत किसन वायकुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी चांगदेव पाटील याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 238 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची 73 वर्षीय चुलत बहीण गंगुबाई कालिदास गडदे या एकट्या राहत असून, घराच्या भाड्यातून आपला उदरनिर्वाह करत होत्या. मात्र, 25 मार्च 2026 रोजी त्या घराला कुलूप लावून कोणालाही न सांगता अचानक बेपत्ता झाल्या. दोन दिवस त्यांचा शोध न लागल्याने अखेर 27 मार्च रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपीने सीसीटीव्ही फुटेजही डिलीट केले तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता, गंगुबाई या संशयित चांगदेव गोवर्धन पाटील याच्यासोबत एका इमारतीत जाताना स्पष्टपणे दिसून आल्या. मात्र त्या तिथून परत बाहेर पडताना दिसल्या नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, संशय बळावू नये यासाठी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही जाणीवपूर्वक डिलीट करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. याच पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता गंगुबाईंचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीने शेअर मार्केटच्या कर्जापायी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली बार्शी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने बेपत्ता वृद्ध महिलेचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासावर भर दिला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी चांगदेव पाटील याला 2 एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या आरोपीने पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. शेअर मार्केटमध्ये झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणि कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याने गंगुबाईंच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टॉवेलने त्यांचे नाक व तोंड दाबून निर्घृण हत्या 25 मार्च रोजी आरोपीने नियोजित कटानुसार गंगुबाई यांना आपल्या घरी बोलावले आणि त्यांना लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याने टॉवेलने त्यांचे नाक व तोंड दाबून त्यांची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह एका काळपट रंगाच्या पिशवीत भरला आणि स्वतःच्या हुंदाई वेरना कारमधून (क्र. MH-20 CS 8937) नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. विश्वास ठेवून गंगुबाईंनी आश्रय दिला होता या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि क्लेशदायक बाब म्हणजे, आरोपी चांगदेव पाटील हा मृत गंगुबाईंकडे गेल्या पाच वर्षांपासून भाड्याने राहत होता. त्यांचे आणि गंगुबाईंचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कुटुंबवत्सल होते. ज्याच्यावर विश्वास ठेवून गंगुबाईंनी त्याला आश्रय दिला, त्याच भाडेकरूने केवळ पैशांच्या लालसेपोटी वृद्ध आजींचा जीव घेतल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp