
पश्चिम विदर्भातील बुलडाणा व वाशीम जिल्ह्यासाठी संत नगरी शेगाव येथे स्वतंत्र विद्यापीठ द्यावे, अशी मागणी विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केली आहे. यासंदर्भात विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात ते रितसर प्रस्ताव मांडणार आ
.
त्यांच्यामते हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो राज्य सरकारकडेही पाठविण्यात आला आहे. परंतु नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात तो चर्चेला आला नाही. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे. बुलडाणा शहर हे अमरावती विद्यापीठाच्या मुख्यालयापासून सुमारे दोनशे किलोमीटर दूर आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना काही कामानिमित्त प्रत्यक्ष येथे येणे गरजेचे असेल तर किमान दोन दिवस द्यावे लागतात. त्यासाठी वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. तो टाळला जावा, यासाठी शेगाव येथे नवे विद्यापीठ स्थापन होणे आवश्यक आहे. सध्या अमरावती विद्यापीठाला पश्चिम विदर्भातील पाचही जिल्हे सांभाळावे लागत असून सुमारे ४०० हून अधिक महाविद्यालयांमुळे विद्यापीठाच्या यंत्रणेवर मोठा ताण येत आहे.
हा ताण कमी करणे तसेच पदवीधरांचा आमदार या नात्याने त्यांच्या हितासाठी काम करणे, याला माझी प्राथमिकता आहे. त्यामुळेच मी हा प्रस्ताव शासनाकडे मांडला असून तो मंजूर करुन घेण्यासाठी आवश्यक ती तयारीही सुरु केल्याचे आमदार लिंगाडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात पदवीधर व इतर घटकांसाठी त्यांनी केलेल्या कामाची माहितीही यावेळी देण्यात आली. भविष्यात पदवीधरांच्या मागण्यांसाठी आपण सतत सक्रीय राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या कामकाजात सक्रीय सहभाग रहावा म्हणून सिनेटवर काम करण्याची माझी तयारी आहे. राज्यपाल महोदयांनी तशी संधी दिल्यास ती आपण आनंदाने स्वीकारू, असेही शेवटी त्यांनी स्पष्ट केले.
अमरावतीच्या न्यायालयात शिदोरी भवन
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील वकिलांनी त्या-त्या न्यायालयात इ-लायब्ररीची मागणी केली आहे. त्यानुसार अमरावती वगळता चारही जिल्ह्यांची मागणी मी पूर्ण केली असून त्यासाठी निधीची तरतूद करुन दिली आहे. अमरावतीत इ-लायब्ररीची सोय अगोदरच उपलब्ध झाल्यामुळे येथे स्थानिकांच्या मागणीनुसार ‘शिदोरी भवन’ देण्यात आले आहे. या भवनाचे काम सुरु झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.