
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेऊन जिल्ह्यातील सहकारी चळवळीची सध्याची स्थिती व बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. या वे
.
यावेळी सुनील फुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण, शेतमाल खरेदी-विक्री सुलभता, ठिबक सिंचन व पाणलोट प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य, तसेच शैक्षणिक कर्ज योजना याबाबत बँकेने केलेले कामकाज मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. त्यांनी स्पष्ट केले की, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मोठे योगदान दिले असून बँकेच्या योजनांचा लाभ हजारो शेतकरी कुटुंबांना झाला आहे.
तसेच सुनील फुंडे यांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काही नवीन उपाययोजना राबवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली. यामध्ये शेतकरी समूह कर्ज योजना, महिला बचत गटांना विशेष भांडवल पुरवठा, ग्रामीण भागात डिजिटल बँकिंग सेवा, तसेच शेतमाल प्रक्रिया उद्योगांना आर्थिक प्रोत्साहन यांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे केवळ कर्जभार कमी होणार नाही, तर रोजगार निर्मितीच्या संधीही उपलब्ध होतील.
या प्रसंगी आमदार डॉ. परिणय फुके यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्च व बाजारपेठेतील अडचणी यावर प्रकाश टाकत शासन स्तरावर अधिक प्रभावी योजनांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनील फुंडे यांच्या माहितीचे कौतुक करत राज्य शासन जिल्हा सहकारी बँकेला आवश्यक ते सहकार्य करेल असे आश्वासन दिले. त्यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, कृषीपुरक व्यवसायांना चालना, कर्जमाफी आणि ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सकारात्मक धोरणे राबवण्याचे आश्वासन दिले. या बैठकीतून भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी नवे मार्ग खुल्या होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.