
Sharad Pawar: राज्य सरकारनं शेतक-यांना केलेल्या मदतीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. राज्यभर पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन करत काळी दिवाळी साजरा केलीय. ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केलीय. तसंच शेतक-यांना सरकारनं मोकळ्या हातानं मदत केली नसल्याचं म्हणत शरद पवारांनी देखील सरकारवर हल्लाबोल केलाय.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी सरकारविरोधात आक्रमक झालीय, सरकारनं शेतक-यांना दिवाळीपर्यंत मदतीचं आश्वासन दिलंय, मात्र शेतक-यांच्या खात्यात अद्यापही मदत जमा न झाल्यामुळे पवारांची राष्ट्रवादी थेट मैदानात उतरलीय. अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानं दिवाळी साजरा न करण्याचा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतलाय. एवढंच नव्हे तर आज पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यभर काळी दिवाळी साजरी करण्यात येतीय.
सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं शेतक-यांचा पिकांचा चिखल झाला, पावसाच्या पाण्यात पिकं सडून गेलीत, त्यामुळे शेतक-यांच्या हातात काहीही लागलं नाही. सरकारनं शेतक-यांसाठी विशेष पॅकेजचीही घोषणा केली. मात्र, सरकारच्या मदतीवरून पवारांनी सरकारला थेट
सवाल केलाय. शेतक-यांना मोकळ्या हातानं मदत केली नसल्याचं म्हणत पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला.
पवारांच्या राष्ट्रवादीच्या आंदोलनाला त्यांच्या सहकारी पक्षानं देखील पाठिंबा दिलाय. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनीही शेतक-यांच्या मदतीवरून सरकारवर निशाणा साधलाय. तर विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय..
मुंबईच्या वांद्रेत पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या रंगाचे आकाश कंदील हातात घेऊन सरकारचा निषेध करण्यात आला.
पुण्यातही राष्ट्रवादीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ओला दुष्काळ जाहीर न केल्यास मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा यावेळी पवारांच्या राष्ट्रवादीनं दिलाय.
सांगलीमध्ये देखील आंदोलन करत ओला दुष्काळ आणि शेतक-यांची कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आलीय.
अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झालं, शेतकरी हतबल झालाय. त्याला आधाराची गरज आहे. सरकारनं देखील शेतक-यांना धीर देण्यासाठी पुन्हा नव्या उमेदीनं उभं करण्यासाठी मदतीची घोषणा केली. मात्र, शेतक-यांना अद्यापही मदत मिळालेली नाही, तसंच सरकारनं केलेली
मदत ही तुटपुंजी असल्याचं म्हणत पवारांच्या राष्ट्रवादीनं राज्यभर आक्रमक पवित्रा घेतलाय.
FAQ
प्रश्न: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काळी दिवाळी का साजरी केली?
उत्तर: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिक खराब झाले आणि महायुती सरकारने मदत वेळेवर दिली नाही, असे आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने १७ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यभर काळी दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निषेध आंदोलन केले गेले, ज्यात ओला दुष्काळ जाहीर करणे आणि सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली. शरद पवारांनी सरकारला ‘फसवी मदत’ देण्याचा आरोप केला.
प्रश्न: काळी दिवाळी आंदोलन कुठे-कुठे झाले आणि काय मागण्या होत्या?
उत्तर: मुंबई (वांद्रे जिल्हाधिकार कार्यालयासमोर काळे आकाशकंदील घेऊन निषेध), पुणे (जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा), सांगलीसह राज्यभर आंदोलने झाली. मागण्या: ओला दुष्काळ जाहीर करणे, हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत बंद करणे. काँग्रेसनेही पाठिंबा दिला.
प्रश्न: सरकारने शेतकऱ्यांसाठी काय मदत घोषित केली आणि विरोधकांचे म्हणणे काय?
उत्तर: महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज घोषित केले, पण दिवाळीपर्यंत मदत खात्यात जमा झालेली नाही. शरद पवार आणि राष्ट्रवादीनुसार ही मदत ‘तुटपुंजी आणि फसवी’ आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि हे आंदोलन राजकीय षडयंत्र आहे. भाजपनेही शरद पवारांवर ‘मगरीचे अश्रू’ असल्याचा आरोप केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.