
Maharashtra Flood Update: मराठवाड्यात आस्मानी संकट कोसळलं आहे. अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे. लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पुराच्या पाण्याने सर्वच वाहून गेले आहेत. काढणीला आलेली पिकं वाहून गेली आहे. नद्यांनी आक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे. महाराष्ट्रभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू केला आहे. शेतक-यांसाठी लालबागचा राजा मंडळ सरसावलं आहे. दुष्काळग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाने 50 लाखांची मदत जाहीर केली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध असलेले लालबागचा राजा मंडळाने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मंडळाने अतिवृष्टीबाधित नागरिकांसाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 50 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करणार आहेत.
दरम्यान, विविध सामाजिक संघटनांकडून मुख्यमंत्री सहायता निधीत अतिवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी पैसे जमा करण्याचं अवाहन केलं जातं आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनीदेखील एक महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यत निधीत जमा केलं आहे. तसंच, नागरिकांनी पुढे येत दुष्काळग्रस्तांना मदत करावी असं अवाहन करण्यात येत आहे.
मराठवाड्यात हाहाकार
20 सप्टेंबरपासून आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 12 जणांचा मृत्यू झालाय. यात 6 जणांचा पुरात वाहून गेल्यानं, अंगावर वीज कोसळून तिघांचा तर इतर तिघांचा अन्य कारणामुळे मृत्यू झालाय.. पुराच्या पाण्यात 357 जनावरं दगावलीत. 13 रस्ते 6 पूल वाहून गेलेत.. एकूण 20 तलाव फुटलेत. तर 1 हजार 416 घराचं पावसामुळे नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे दोन शाळाही उद्ध्वस्त झाल्यात.
बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय. पुरामुळे घरं, शेतीचे नुकसान झालं असून त्याचसोबत जनावरं देखील दगावल्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय. एका बाजुला पूर आल्यानंतरचे दृश्य तर दुसऱ्या बाजूला पूर ओसरल्यानंतरचे सद्यस्थितीचे दृश्य समोर आलीये.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.