
विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती येथे सलग २५ तास डोसे बनवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी या कालावधीत १५,७७३ डोसे तयार केले, जो त्यांचा एकूण ३२ वा विक्रम ठरला. यापूर्वी त्यांनी गेल्या वर्षी नागपूरमध्ये २४ तासांत १४,४०० डोसे बनवण्याचा
.
हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी विष्णू मनोहर यांनी शनिवारी सकाळी ७ वाजता डोसे बनवण्यास सुरुवात केली. रविवारी सकाळी ६ वाजता त्यांनी १५,७०० डोसे बनवून आपला जुना विक्रम मोडीत काढला. त्यांच्या या विक्रमाची नोंद घेण्यासाठी ‘इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे पंच उपस्थित होते, ज्यांनी डोशांची मोजदाद केली.
१२ तासांनंतर पंचांनी त्यांना २० मिनिटांचा ब्रेक दिला. या ब्रेकनंतर ते पुन्हा कामाला लागले. अखेर, रविवारी सकाळी ८ वाजता त्यांनी १५,७७३ वा डोसा तयार करून नवा विक्रम पूर्ण केला. त्यांच्या या विक्रमाचा जल्लोष सहकारी आणि उपस्थित अमरावतीकरांनी टाळ्यांच्या गजरात साजरा केला. यावेळी ‘इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रमुख प्रतिनिधी प्रवीण राऊत यांनी पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन विष्णू मनोहर यांच्या विक्रमाची अधिकृत घोषणा केली.
शनिवारी सकाळी डोसे बनवण्यास सुरुवात झाल्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अमरावतीकरांची मोठी गर्दी कायम होती. या सर्वांना मोफत डोशाचा आस्वाद घेता आला. सुमारे ३० हजारांहून अधिक अमरावतीकरांनी यावेळी डोशाची चव चाखली. विष्णू मनोहर यांनी स्वतः १५,७७३ डोसे बनवले, तर त्यांच्या पत्नी अपर्णा मनोहर आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून एकूण सुमारे ३० हजार डोसे तयार केले. यासाठी उडीद डाळ, चणा डाळ, तांदूळ आणि मेथी दाण्यांचे ६५० किलोग्रॅम मिश्रण वापरण्यात आले. याशिवाय तेल, तूप, हिरवी मिरची, खोबरे, कढीपत्ता आणि कोथिंबीरचाही वापर करण्यात आला. नागरिकांना डोसे देण्यासाठी खास जळगावहून केळीची पाने मागवण्यात आली होती.
यावेळी बोलताना विष्णू मनोहर म्हणाले, “नागपूरला २४ तासात डोसे तयार करण्याचा नोंदवलेला स्वतःचा विक्रम मी अमरावतीत मोडला. यापुढे असे दहा मॅरेथॉन पूर्ण करायचे असून, पुढचा विक्रम मी अमेरिकेत करणार आहे.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.