digital products downloads

शेवगाव 2 तर पाथर्डीत पकडले 7 कॉपीबहाद्दर, 16 ‘डमी’वरून संशयकल्लोळ: इंग्रजीच्या पहिल्या पेपरला जिल्ह्यात 116 केंद्रांवर 61 हजार 319 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा – Ahilyanagar News

शेवगाव 2 तर पाथर्डीत पकडले 7 कॉपीबहाद्दर, 16 ‘डमी’वरून संशयकल्लोळ:  इंग्रजीच्या पहिल्या पेपरला जिल्ह्यात 116 केंद्रांवर 61 हजार 319 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा – Ahilyanagar News


प्रतिनिधी | अहिल्यानगर बारावीच्या परीक्षेला १० फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. इंग्रजीचा पहिला पेपर जिल्ह्यातील ११६ परिक्षा केंद्रांवर ६१ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी दिला. तर १ हजार १४३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पाथर्डी तालुक्याची

.

अहिल्यानगर | बनावट हॉलतिकीटच्या आधारावर पाथर्डी तालुक्यातील एका केंद्रावर १६ डमी उमेदवार परीक्षा देत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते हरिहर गर्जे यांनी थेट जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे निर्देश दिले.

पहिल्या प्रश्नात वेळ गेला बाकी सोपे ^ प्रश्नपत्रिका सोपी होती, त्यात चुका नव्हत्या. फक्त मुलांना पहिला प्रश्नात, पॅराग्राफ वरून उत्तरे शोधण्यात वेळ गेला. बाकी एकूणच प्रश्नपत्रिका सोपी असल्याने बहुतांश मुले पास होतील. ज्या प्रश्नाला वेळ लागतो तो प्रश्न सोडून ज्या प्रश्नाचे उत्तर येते, ते अगोदर लिहिण्याचे सांगितले होते. ज्या मुलांनी जेमतेम अभ्यास केला असेल, त्यांनी देखील पेपर सोपा गेल्याचे सांगितले. -वैभव चोथे शिक्षक, इंग्रजी, महेश मुनोत विद्यालय. हा तर निव्वळ फार्स ^ हॉलतिकीट तपासणी हा निव्वळ फार्स आहे. बोर्डाने दिलेले हॉलतिकीटांमध्ये छेडछाड करून तो बनावट केल्याची दाट शक्यता आहे. शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे बनावट विद्यार्थी सापडत नाहीत. सीसीटीव्हीची पडताळणी केल्यास सत्य समजेल. – ॲड. हरिहर गर्जे, तक्रारकर्ते.

बनावट विद्यार्थी आढळले नाहीत ^ शिक्षण विभागाकडून ३ वेळा तपासणी करण्यात आली. मात्र यात बनावट विद्यार्थी आढळले नाहीत. मात्र यापुढे शिक्षण विभाग हॉल तिकिटासह विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तपासूनच त्यांना केंद्रात सोडले जाईल. संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp