
कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणाची तिने वाचत्या करु नये म्हणून तिची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा मुख्य आरोपी विशाल गवळीने तळोजे कारागृहात आत्महत्या केली आहे. यावर विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केले आहेत.
काय म्हणाले वकील?
विशाल गवळीच्या मृत्यू संशयास्पद असून पोलिस यंत्रणेने विशालला मारलं आहे. अक्षय शिंदे सारख विशाल गवळीला सुद्धा मारतील अशी भीती मी व्यक्त केली होती शेवटी तेच झालं. या संदर्भात वकील संजय धनके यांनी न्यायालयात अर्ज देखील दिला होता की, अक्षय शिंदे सारखी याला देखील न्यायालयात भिती आहे. आणि तेच झालं. अक्षय शिंदे प्रमाणे विशाल गवळीला देखील कारागृहात त्रास दिला जायचा. विशालने देखील ही माहिती वकिलांना दिली होती. एवढंच नव्हे तर आपण हे कृत्य केलं नसल्याचं देखील त्याने सांगितलं होतं.
(हे पण वाचा – कल्याण बलात्कार प्रकरण: आरोपी विशाल गवळीची आत्महत्या; टॉयलेटमध्ये पहाटे 3.30 वाजता…)
कशी केली आत्महत्या?
विशाल गवळीच्या बहिणीने वकिलांना सकाळी 7.30 वाजता फोन केला की, विशाल गवळीने आत्महत्या केली आहे. विशाल गवळी हा तळोजे जेलमध्ये होता. पहाटे 3.30 च्या सुमारास आंघोळीला गेला असता त्याने टॉवेलच्या मदतीने आत्महत्या केली.
काय आहे प्रकरण?
दिल्लीतील निर्भया हत्याकांडाची आठवण करून देणारी घटना कल्याणमध्ये घडली होती. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशाल गवळी नावाच्या आरोपीने एका अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर भयंकर रितीने अत्याचार केले होते. यानंतर तिने सदर प्रकरणाची कुठे वाच्यता करू नये यासाठी तिचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेह एका बॅगेमध्ये कोंबून ठेवला.
गुंड प्रवृत्तीच्या विशाल गवळीने तो राहात असलेल्या परिसरात दहशत निर्माण केली होती. रिक्षाचालक असलेल्या विशाल गवळी याच्याविरोधात विनयभंगाचा 5 गुन्हे दाखल आहेत. विशाल गवळी याच्या या राक्षसी कृत्यानंतर चिमुरडीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याची बायको साक्षी हिनेदेखील मदत केली.
या कृत्यात पत्नीची देखील साथ
खासगी बँकेत काम करणारी साक्षी जेव्हा घरी आली तेव्हा विशालने घडलेला प्रकार तिला सांगितला. यानंतर दोघांनी बसून मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा कट रचला. दोघांनी मिळून रक्त पुसले, विशालने मित्राची रिक्षा बोलावली ज्यातून विशाल आणि साक्षीने बॅगेत भरलेला मुलीचा मृतदेह बापगावला नेला. तिथे मृतदेह फेकून दिला आणि दोघे घरी आले. यानंतर विशालने दारू ढोसली आमि तो शेगावला पळून गेला होता
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.