
Sharad Pawar Speech In Baramati: संकटसमयी ‘मोठ्या लोक’ मदतीसाठी माझ्याकडे धाव घेतात असं विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी जाहीरपणे हे विधान केलं. तरुणांनी कायम कामासाठी तयार असलं पाहिजे असं सांगतानाच शरद पवारांनी कोणत्याही ठराविक प्रसंगाचा उल्लेख न करता आपली आठवण अनेकांना मोठ्या कामासाठी होते असं म्हटलं आहे.
कष्ट करण्याची तयारी ठेवा
बारामतीतील ‘बारामती हायड्रोलिक’ कंपनीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. “देशावर संकट आले की, काही ‘मोठे’ लोक मदतीसाठी शरद पवारांचे नाव घेतात. ही बारामतीची ताकद आहे,” असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले. बारामतीमधील तरुणांसमोरच भाषण करताना पवारांनी हे विधान केलं. “तरुणांनी कष्ट करण्याची तयारी ठेवा. काम द्यायचे असेल, तर बारामतीच्या तरुणांना द्यावे, असा संदेश देशात गेला पाहिजे,” असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
असा संदेश देशात गेला पाहिजे
“तरुणांनी कष्ट करायची ताकद ठेवली पाहिजे. कोणतेही संकट आले, तरी चिंता करू नये,” असा कानमंत्र पवारांनी दिला. “देशावर संकट आले की, काही मोठे लोक शरद पवार यांचे नाव घेतात. त्यांचे नाव आता घेत नाही. त्यामुळे कोणतेही संकट आले, तर त्याची सोडवणूक करण्यात येईल. काम द्यायचे असेल, तर ते बारामतीतील तरुणांना दिले पाहिजे, असा संदेश देशात गेला पाहिजे,” अशी इच्छा शरद पवारांनी बोलून दाखवली.
तेव्हा स्थानिकांनी प्रतिसाद दिला
बारामतीकरांनी कशाप्रकारे आपल्या काही निर्णयांना समर्थन केलं याबद्दलही पवारांनी आपल्या भाषणात भाष्य केलं. “विधानसभेत बारामतीतून निवडून गेल्यावर काम करण्याची संधी मिळाल्यावर बारामतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सुरू करण्याचा निर्णय घेतला, दुधावर प्रक्रिया करण्यासाठी डायनामिक्स कंपनी आणण्याचे ठरवले. तेव्हा स्थानिकांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर बारामती उद्योगाचे केंद्र झाले,’ असेही पवार म्हणाले.
किल्लारी भूकंपादरम्यान पवारांची भूमिका ठरली निर्णायक
1993 च्या किल्लारी भूकंपादरम्यान शरद पवार यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आवर्जून उल्लेख केली जाणारी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता, निर्णयक्षमता आणि नेतृत्वाने लाखो लोकांना मदत मिळवून दिली आणि देशाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रणालीला नवीन दिशा दिली. 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटे साडेतीन ते पाच वाजण्याच्या सुमारास 6.2-6.3 रिश्टर स्केलचा भूकंप किल्लारी (लातूर जिल्हा) येथे आला, ज्यामुळे सुमारे 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आणि 30 हजारहून अधिक जखमी झाले.
आपत्ती व्यवस्थापनाची गरज अन् मोठा निर्णय…
भूकंपानंतर पवार यांना आढळले की भारतात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नाही. त्यांनी ही बाब केंद्राकडे उपस्थित केली आणि सोनिया गांधी यांनी त्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रणाली उभारण्याची जबाबदारी दिली. दोन वर्षांच्या प्रयत्नाने ही प्रणाली तयार झाली, जी आज देशाच्या आपत्ती व्यवस्थापनाचा आधार आहे. 2023 मध्ये 30 व्या वर्धापन दिनी किल्लारीत झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात पवार यांनी या आठवणी सांगितल्या आणि म्हटले की, यशवंतराव चव्हाण यांच्याकडून संकटकाळात मदत करण्याची शिकवण मिळाली. शरद पवार यांच्या या कृतींमुळे केवळ किल्लारी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने आपत्तीला तोंड देण्याची क्षमता मिळवली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.