
संजय राऊत हे रोज सकाळी बेडूक उड्या मारतात. खेकड्यासारखे मराठी माणसांचे पाय ओढण्याचे काम राऊतांकडून केले जाते. ठग कोण आहेत त्यांची गँग कुणाकडे आहे त्यांचे सरदार कोण आहे. खंडणीखोर कोण आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीवेळी ओळखले आहे,
.
नवनाथ बन म्हणाले की, जय शहा यांच्यावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही. खरतर भारतील खेळाडूंनी स्पर्धा जिंकत ही ट्रॉफी जिंकलेली आहे. खेळाचे मैदान असो की युद्धाचे भारतीयांचे मान उंचावते. युद्धावेळी देखील आपण त्यांना घरात घुसून मारले आहे. आताही ही ट्रॉफी त्यांच्याकडून घेऊन येऊ. पाकिस्तान हरल्यामुळे राऊतांना दुख झाले. तुम्ही पाकिस्तानची चिंता करा असा टोला बन यांनी लगावला आहे.
मविआचे सरकार लोकशाही विरोधी होते
नवनाथ बन म्हणाले की, निधीवाटपावरुन भाजपवर आरोप करण्यापूर्वी पगारी नेते संजय राऊत यांनी जरा आरश्यात पाहिले पाहिजे. मविआचे सरकार असताना मस्तवाल पणा करत भाजपच्या 12 आमदारांना दीड वर्षांसाठी निलंबित केले त्यांना मानधन ने देत लोकशाहीची हत्या केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपच्या 105 आमदारांना निधी वाटप करण्यात आले नाही. निधीमध्ये असमान वाटपाची परंपरा तुम्हीच सुरू केली हे तुम्ही विसरले का? मविआचे सरकार असताना भाजपच्या आमदारांना निधी द्यायचा नाही आणि आता निधीवाटपावर तुम्ही बोलायचे? तुम्ही लोकशाही विरोधी होतात, महायुतीवर टीका करण्यापूर्वी मविआचे काळे कारनामे एकदा उबाठाने आठवले पाहिजे, असा टोला बन यांनी लगावला आहे.
मतदारांनी जागा दाखवली
नवनाथ बन म्हणाले की, लाच खोरी आणि कमिशन खोरीची परंपरा ही उद्धव ठाकरे यांच्या गटाची आहे. लोकसभेला 48 पैकी 30 जागा जिंकल्या तेव्हा तुम्ही मतचोरी केली होती का? तुमचा भाऊ सुनील राऊत हा विक्रोळी मधून निवडून आले तेव्हा तुम्ही मतचोरी केली का? तेव्हा मतदारांना तुम्ही विकत घेतले होते का? लोकसभेला मतचोरी झाली असेल तेव्हा तुम्ही चकार शब्द काढला नाही. विधानसभा निवडणूकीत जनतेने देवाभाऊंना निवडून दिले आणि तुमचा पोटशूळ उठला. मतदारांनी देवाभाऊ आणि महायुतीला साथ देत मविआला नाकारले आहे. आगामी निवडणूकीत मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील, असा इशारा बन यांनी मविआला दिला आहे.
संजय राऊत मेंटल
नवनाथ बन म्हणाले की, कोणाच्या ताफ्यात रुग्णवाहिका आहे आणि कुणाच्या ताफ्यात नाही यावरुन संजय राऊत यांचे पोट दुखत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, राऊतांच्या ताफ्यातही एक रुग्णवाहिका देऊन ठेवा. कारण त्यांना वारंवार मानसिक झटका येत असतो. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी एक रुग्णवाहिका त्यांच्या ताफ्यात देण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मी करतो असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.