
Maharashtra Local Body Election : राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टीक्षेपात असतानाच असंख्य घडाडमोडीना उधाण आलेलं असताना राजकीय आरोप प्रत्यारोपसुद्धा नजरा वळवताना दिसत आहेत. यामध्ये आता शिंदेंच्या शिवसेनेत असणारे मतभेद जाहीरपणे समोर येत असल्यानं राजकीय समीकरणांचा हा मुद्दा नेमका कोणत्या वळणावर जाणार हासुद्धा प्रश्न उपस्थित आहे.
‘संजय शिरसाटांची मनमानी, पक्ष बुडवतायत’
संजय शिरसाट एक हाती पक्ष डुबवत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे संभाजी नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे, त्यांची पक्षात मनमानी सुरू आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ते धमक्या देतात, असा आरोप जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केलाय त्यामुळे संभाजी नगरात शिंदेच्या शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे चित्र आहे, याबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही जंजाळ यांनी स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण प्रकरणात, खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संभाजीनगरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना फोन करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. पक्षाच्या कार्यशैलीवर जंजाळ नाराज असून त्यांनी संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केले असल्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी त्यांना फोन केल्याचे समजत आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेत असणाऱ्या या वृत्तासंदर्भात झी 24तासशी संवाद साधलं असता, जंजाळ म्हणाले ‘मी ना एकनाथ शिंदे, ना शिवसेना पक्षावर नाराज आहे. तर मी पालकमंत्र्यांच्या कामावर नाराज आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि पक्ष चांगल्या पद्धतीनं बांधण्यात आला. इथं पक्षाचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू असताना ज्यांनी आम्हाला विरोध केला, आम्हाला आणि त्यांना प्रचंड त्रास दिला, आज त्याच कार्रकर्त्यांना घेत यांच्या हाताखाली काम करा असं दुसऱ्या कार्यकर्त्यांना सांगणं हे कसं शक्यंय?’
कार्यकर्ता सक्षम नसता, तर त्यानं निवडणुकीत आपल्याला मताधिक्य मिळवून दिलं नसतं, असा टोला लगावत आपल्यावर अन्याय होणार असल्याची पूर्वकल्पना होती असं जंजाळ यांनी म्हटलं. सध्या आगामी निवडणुकीच्या नियोजनासाठी सात-आठ बैठका झाल्या मात्र त्यात मला कुठंही सहभागी करून घेण्यात आलं नाही. छत्रपती संभाजीनगरच्या शहर कार्यकारिणीला भेट दिली, याची मला कल्पना नाही. नगरपरिषदा, नगरपालिकेच्या निवणुकांमध्ये काही कार्यकर्त्यांना निरीक्षक म्हणून बाहेर पाठवण्यात आलं, या साऱ्याची आपल्याला जिल्हाप्रमुख म्हणून काहीच कल्पना नसल्याचं म्हणत जंजाळ यांनी खंत व्यक्त केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



