digital products downloads

संडे अँकर: प्रत्येक वकिलाने वर्षभरात गरिबांची एक केस मोफत लढावी यासाठी सरकार बनवेल मार्गदर्शक तत्त्वे; मिळेल चांगल्या कामाचे प्रमाणपत्र

संडे अँकर:  प्रत्येक वकिलाने वर्षभरात गरिबांची एक केस मोफत लढावी यासाठी सरकार बनवेल मार्गदर्शक तत्त्वे; मिळेल चांगल्या कामाचे प्रमाणपत्र

  • Marathi News
  • National
  • Government Will Formulate Guidelines So That Every Lawyer Can Fight One Case Of The Poor For Free Every Year; Will Get A Certificate Of Good Work

पवन कुमार | नवी दिल्ली22 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशात कायदेशीर मदतीसाठी पात्र ८०% लोकांना मोफत कायदेशीर मदत मिळत नाही. केंद्र सरकारच्या अंतर्गत अहवालात ही वस्तुस्थिती समोर आली. यासोबतच प्रत्येक वकिलाला एका वर्षात गरीबांची किमान एक केस मोफत लढवणे बंधनकारक करण्यात यावे, अशी सूचना कायदा मंत्रालयाला करण्यात आली आहे. वकिलाची फी परवडत नसलेल्या लाखो लोकांना याचा फायदा होईल. वकिलांनी सार्वजनिक सेवेशी सक्तीने जोडले जावे आणि गरीब आणि गरजू लोकांना मोफत कायदेशीर मदत मिळावी यासाठी केंद्रीय कायदा मंत्रालय अशी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा विचार करत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कायदा मंत्रालयाच्या अहवालात देशातील तुरुंगांमध्ये ४ लाखांहून अधिक कैदी असून त्यातील ७०% विचाराधीन आहेत. यातील ९०% कैदी मोफत कायदेशीर मदतीस पात्र आहेत, परंतु त्यांना ती मिळत नाही. विधी मंत्रालय वरिष्ठ वकील, तज्ञ आणि विधी सेवा प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश करून मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे. लवकरच त्याचा मसुदा सार्वजनिक केला जाईल. त्यानंतर ताे अंमलबजावणीसाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवला जाईल.

वकिलांचे मानधन वाढवून त्यांना प्रमाणपत्र देण्याची सूचना

  • प्रत्येक वकील एका गरिबासाठी वर्षभरात एक केस मोफत लढवेल. बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून सूचना जारी हाेतील.
  • असे करणारे वकीलच स्टेट बार कौन्सिल किंवा बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून सवलत मिळण्यास पात्र असतील.
  • सुप्रीम काेर्ट सर्व हायकाेर्ट वकिलांच्या समावेशाने सरकारच्या मदतीने पॅनल करेल, जे गरजूंना मोफत कायदेशीर मदत देईल.
  • मोफत खटले लढणारे वकील संबंधित पक्षाकडून पैसे मागणार नाहीत,यावर बार असोसिएशनकडूनही लक्ष ठेवले जाईल.
  • गरिबाची केस लढण्यासाठी नियुक्त वकिलाला त्याच्या योगदानाच्या आधारे बार असोसिएशन विशेष प्रमाणपत्र देतील.
  • जेव्हा वकील वरिष्ठ वकील, न्यायिक अधिकारी, उच्च न्यायालय वा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशा पदांसाठी अर्ज करेल, तेव्हा गुणवत्तेचे मूल्यांकन करताना, सार्वजनिक हितासाठी लढलेल्या खटल्यांना प्राधान्य दिले जाईल. विधी सेवा प्राधिकरण वकिलांना एका खटल्यासाठी १५०० ते ७५०० रु. मानधन देतेे. त्यात वाढ करण्याचीही सूचना आहे. प्राधिकरणामार्फत देशाच्या प्रत्येक भागात याेजनेची माहिती देण्यासाठी जनजागृती मोहीम राबवतील.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp