
संतोष देशमुख यांना वाल्मीक कराड टोळीकडून अमानुष मारहाण केल्याचे व्हिडिओ व फोटो समोर आले व एकच खळबळ संपूर्ण महाराष्ट्रात उडाली. अत्यंत क्रूरपद्धतीने व अत्याचार करत संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचे या पुराव्यातून स्पष्ट झाले आहे. या मारहाणीचे
.
आरोपींनी हैवानालाही लाज वाटेल असे कृत्य संतोष देशमुख यांच्यासोबत केले आहे. अर्धमेल्या अवस्थेत संतोष देशमुख यांना बसवून त्यांच्यासोबत सेल्फी काढले व संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावर लघवी देखील करण्यात आली आहे. पाठीवरील व्रण अमानुषत मारहाणीचा स्पष्ट पुरावा आहे. मारहाणीनंतर आरोपींनी संतोष देशमुख यांच्यासमवेत फोटो काढला असून त्यात त्यांचे आसुरी हास्य दिसून येतेय. जयराम चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या फोटोंमध्ये दिसून येत आहेत.
संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी ज्या पाईपचा वापर केला होता, त्या पाईपचे अक्षरशः 15 तुकडे झाले आहेत. इतकी बेदम मारहाण संतोष देशमुख यांना करण्यात आली होती. ही मारहाण इतकी भीषण होती की त्या पाईपचे तब्बल 15 तुकडे पडले. घटनास्थळी या पाईपचे तुकडे सीआयडीच्या तपासात हाती लागले आहेत. पाईपच्या पडलेल्या तुकड्यांचे फोटो देखील सीआयडीने चार्जशीटमध्ये पुरावा म्हणून जोडण्यात आले आहे.
पाईपचे झालेले 15 तुकडे

संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली आणि आरोपी वाल्मीक कराडच्या जवळचा मानला जाणारा मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणीने जोर धरला होता. त्यानुसार आज धनंजय मुंडेने राजीनामा दिला आहे. मात्र आमदारकीचा राजीनामा अद्याप बाकी आहे. आमदारकीचा देखील राजीनामा देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
अमानुष मारहाणीचे भयावह फोटो
1. संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण केल्यानंतर आरोपी त्यांच्या छातीवर पाय देऊन उभा असल्याचे या फोटोमध्ये दिसून येत आहे.

2. संतोष देशमुख यांना मारताना सुदर्शन घुले.

3. संतोष देशमुख यांना मारल्यानंतर राक्षसी खिदळणारा महेश केदार

Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.