digital products downloads

संभाजीनगरच्या ‎व्हिट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेची ‎आता विभागीय आयुक्तांकडून चौकशी‎: पालकमंत्र्यांच्या पुत्राची कंपनी लिलावात सहभागी होती‎ – Chhatrapati Sambhajinagar News

संभाजीनगरच्या ‎व्हिट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेची ‎आता विभागीय आयुक्तांकडून चौकशी‎:  पालकमंत्र्यांच्या पुत्राची कंपनी लिलावात सहभागी होती‎ – Chhatrapati Sambhajinagar News



रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल व्हिट्स आणि‎लगतच्या मोकळ्या जागेच्या वादग्रस्त‎ लिलाव प्रक्रियेची आता विभागीय आयुक्त ‎जितेंद्र पापळकर यांच्यामार्फत उच्चस्तरीय‎ चौकशी होणार आहे. या लिलावात मोठ्या ‎प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप‎ विरोधी पक्षांनी केला होता. या प्रकरणाचे‎ गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने‎ चौकशी समितीमध्ये बदल केला असून,‎आता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली‎ 8 सदस्यांची समिती या प्रकरणाचा छडा‎ लावणार आहे.‎ 3 महिन्यांपूर्वी या प्रकरणाची चौकशी ‎जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या‎ अध्यक्षतेखालील समितीकडे सोपवण्यात ‎आली होती. मात्र, आता त्यात बदल करून‎ही जबाबदारी थेट विभागीय आयुक्त‎ पापळकर यांच्याकडे देण्यात आली‎ आहे. धनदा कॉर्पोरेशन कंपनीची देणी‎ भागवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 2018‎ मध्ये कंपनीच्या मालमत्ता लिलावाचे आदेश‎ दिले होते. जिल्हा प्रशासनाने मे 2025 मध्ये‎ लिलाव प्रक्रिया राबवली. यात पालकमंत्री‎‎ संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट‎ यांच्या ‘सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट’‎कंपनीने 64 कोटी 83 लाखांची बोली लावून‎हा लिलाव जिंकला होता.‎ शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांचे पुत्र या‎लिलाव प्रक्रियेत होते. महापालिका, जिल्हा‎परिषद निवडणुका महायुतीत असलेल्या या‎ दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढल्या. त्यावेळी ‎दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात‎ आले. या पार्श्वभूमीवर चौकशी ‎जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय‎ आयुक्तांकडे देण्यामागे पालकमंत्र्यांच्या ‎कोंडीचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.‎ 150 कोटी रुपयांची मालमत्ता ‎अवघ्या 64 कोटी रुपयांत?‎ या लिलावानंतर उबाठासह सर्वच विरोधी‎पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला. या‎ मालमत्तेचे बाजारमूल्य 150 कोटींच्या घरात‎ असताना ती केवळ 64 कोटींत मोजक्याच ‎लोकांना देण्यात आल्याचा आरोप झाला.‎ विधिमंडळातही हा मुद्दा गाजला. विरोध‎पाहून मंत्र्यांच्या मुलाने लिलावातून माघार‎ घेतली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी‎ चौकशीचे आश्वासन दिले होते.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp