digital products downloads

संभाजीनगरमध्ये अवैध दारू विक्रीवरून दंगल; घर, वाहनांवर तुफान दगडफेक: धूलिवंदनाच्या उत्साहाला हिंसक गालबोट; राज्य राखीव दल तैनात – Chhatrapati Sambhajinagar News

संभाजीनगरमध्ये अवैध दारू विक्रीवरून दंगल; घर, वाहनांवर तुफान दगडफेक:  धूलिवंदनाच्या उत्साहाला हिंसक गालबोट; राज्य राखीव दल तैनात – Chhatrapati Sambhajinagar News



शहरातील इंदिरानगर (गारखेडा) आणि वाळूजजवळील कमळापूर भागात धूलिवंदनाच्या दिवशी हिंसाचाराच्या घटना घडल्या. अवैध दारू विक्रीच्या वादातून इंदिरानगरात दोन गट भिडल्याने भीषण दंगल झाली, तर कमळापुरात पाणी उडवण्यावरून सशस्त्र हाणामारी झाली. दरम्यान, बुधवारी रात्री पोलिसांनी इंदिरानगरात आरोपींची धरपकड सुरू केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (३ मार्च) दुपारी २ वाजेच्या सुमारास इंदिरानगरमधील जुनेद किराणा दुकानापाशी रस्त्यात उभे राहण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद अवैध दारू विक्रीच्या वर्चस्वावरून असल्याचे समोर आले आहे. एका गटातील विकास, आकाश, योगेश आणि संतोष खरात, तर दुसऱ्या गटातील जावेद, नवाब, गुलाब आणि सत्तार खान यांच्यात हाणामारी झाली. याचा वादाचा राग मनात धरून रात्री १० च्या सुमारास १५० जणांच्या जमावाने इंदिरानगर भागात हल्ला चढवला. रहिवासी राजू जाधव यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या ५ दुचाकींची तोडफोड केली व घरांवर भीषण दगडफेक केली. पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेतले असून परिसरात राज्य राखीव दलाचे जवान तैनात केले. जवाहरनगरचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार म्हणाले की, ‘तपासात तथ्य आढळल्यास अ‍ॅट्रॉसिटीचे कलम वाढवू.’ दुसरीकडे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ म्हणाले की, हल्ला करणारे अवैध दारू विक्री व्यवसायातील असल्याचे नागरिकांनी सांगितले. पोलिस आयुक्तांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp