digital products downloads

संभाजीनगरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पेट्रोल पंपावर पत्नीची गळा चिरून हत्या: करमाडला भरदिवसा विभक्त पतीचे कृत्य, आरोपीस अटक – Chhatrapati Sambhajinagar News

संभाजीनगरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पेट्रोल पंपावर पत्नीची गळा चिरून हत्या:  करमाडला भरदिवसा विभक्त पतीचे कृत्य, आरोपीस अटक – Chhatrapati Sambhajinagar News


विभक्त राहणाऱ्या पत्नीचा पतीनेच चारित्र्याच्या संशयातून चाकूने गळा चिरून खून केल्याची अत्यंत धक्कादायक घटना करमाड शिवारातील ‘शिवसमर्थ’ पेट्रोल पंपावर घडली. गुरुवारी (९ एप्रिल) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास हा थरार घडला.

.

पूजा गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, ह. मु. करमाड) असे मृत महिलेचे नाव आहे, तर सत्यम रावसाहेब गावंडे (२८, रा. चित्तेपिंपळगाव) असे मारेकरी पतीचे नाव आहे. या घटनेनंतर कचनेर शिवारात एका शेतात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अवघ्या दीड तासात बेड्या ठोकल्या आहेत. पूजा गावंडे या गेल्या दीड महिन्यापासून करमाड येथील पेट्रोल पंपावर काम करत होत्या. गुरुवारी दुपारी संशयित सत्यम दुचाकीवरून पंपावर आला. स्टँडजवळ दुचाकी उभी करून त्याने अचानक पूजाचा हात पकडला आणि काही कळण्याच्या आतच तिच्या पाठीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली.

पूजा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळताच नराधम सत्यमने तिचा गळा चिरला. हा संपूर्ण थरार पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खून केल्यानंतर सत्यमने दुचाकीवरून पिंपरीराजामार्गे कचनेरच्या दिशेने पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने माहिती मिळवत त्याचा पाठलाग केला आणि शेतात लपलेल्या सत्यमला शिताफीने अटक केली.

सत्यम चाकू घेऊन माझ्यामागे धावला, जीव वाचवून पळालो

मी पंपावरील केबिनमध्ये बसलो होतो. अचानक महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्याने मी तातडीने बाहेर आलो. तेव्हा एक जण कर्मचारी पूजावर चाकूने सपासप वार करताना दिसला. तिला वाचवण्यासाठी धावलो. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने चाकू उगारून माझा पाठलाग केला. मग मी लांब पळालो. आरोपीनेही दुचाकीसह पळ काढला.

रेकी केली, गर्दी नसताना शांत डोक्याने हत्या

पत्नीची हत्या करण्यासाठी सत्यम सकाळी पेट्रोल पंपावर आला होता. परंतु पंपावर गर्दी असल्याने त्याला संधी साधता आली नाही. दुपारी पंपावर गर्दी नसताना त्याने शांतपणे गळा चिरून पत्नीची हत्या केली. त्यानंतर कमरेला चाकू खोचून दुचाकीवरून पळ काढला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp