
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबई वगळता राज्यातील २८ महापालिकांच्या प्रभाग रचनेसाठी आदेश जारी करण्यात आले आहेत. ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील महापालिकांत ४ सदस्यीय प्रभाग रचन
.
प्रभाग रचनेची जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. त्यांनी तयार केलेला प्रारूप प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करावा लागेल. त्यानंतर त्यास प्रसिद्धी दिली जाईल आणि नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील. या हरकतींवर राज्य शासन नियुक्त अधिकृत प्राधिकृत अधिकारी सुनावणी घेतील आणि अंतिम प्रभाग रचना आयोगाकडे सादर केली जाईल. त्यानंतर अंतिम मंजुरी मिळाल्यावर ती प्रसिद्ध केली जाईल. नगरविकास विभागाने टप्प्यांची रूपरेषा जाहीर केली असली तरी यासाठी कोणतीही ठोस कालमर्यादा दिलेली नाही. निवडणूक आयोग यासंदर्भात स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जाहीर करणार असून त्यानंतरच ही प्रक्रिया गती घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या आहेत २८ महापालिका अ वर्ग : पुणे, नागपूर
ब वर्ग : नाशिक, नवी मुंबई, ठाणे
वर्ग : नवी मुंबई , वसई विरार, छत्रपती संभाजीनगर , कल्याण- डोंबिवली
ड वर्ग : अहिल्यानगर, अमरावती, अकोला, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, जळगाव, नांदेड-वाघाळा, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी व जालना
अपक्ष, लहान पक्षांची दमछाक
चार वॉर्ड मिळून एक प्रभाग केल्याने अपक्ष निवडणूक लढवणारे आणि लहान पक्षांची दमछाक होणार आहे. विशेष म्हणजे या प्रभाग रचनेमुळे जातीय समीकरणेदेखील लावणे अत्यंत कठीण होणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.
अाेबीसी, महिला अारक्षण चक्रानुकार; एससी, एसटी उतरत्या क्रमानेच
जुनीच प्रभाग रचना कायम राहिली तर सलग दुसरी निवडणूक असल्यामुळे अाेबीसी व सर्वसाधारण प्रवर्ग किंबहुना दाेन्ही प्रवर्गातील महिलांचे अारक्षण नव्याने काढावे लागेल. प्रभागनिहाय वाढीव मतदारांची पुन्हा विभागणी केली जाणार असून त्यासाठी लगतच्या निवडणुकीमधील अंतिम मतदार यादीचा अाधार घेतला जाईल. अनुसूचित जाती व जमाती या दाेन्ही प्रवर्गांचे अारक्षण मात्र लाेकसंख्येच्या उतरत्या क्रमानेच हाेईल.
दिवाळीनंतर निवडणुका प्रभाग रचना जुन्याच पद्धतीची राहणार असून अारक्षण साेडत, प्रभागनिहाय मतदार याद्यांची सुधारणा यासाठी साधारणपणे दाेन महिन्यांचा कालावधी लागेल. जून ते सप्टेंबर पावसाळा असल्याने मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर अपेक्षित आहेत. संभाजीनगर : पक्षीय बलाबल
उत्तर दिशेपासून सुरुवात करून अखेर दक्षिण दिशेकडे जावे प्रभाग रचनेत उत्तर दिशेपासून सुरुवात करून, पूर्व, पश्चिम आणि अखेर दक्षिणेकडे जावे, असा स्पष्ट आदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे रचनेत भौगोलिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा पहिला वॉर्ड हर्सूल येथून सुरू होतो, तर शेवटचा वॉर्ड हा सातारा-देवळाई असणार आहे. ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १५ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाने ईव्हीएम, स्ट्राँगरूम व अन्य निवडणूक व्यवस्थापनाची माहिती सादर करण्यास सांगणारे पत्र महापालिकांना पाठवले होते. त्यावरूनच १० जून रोजी प्रभाग रचनेबाबतचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
संभाजीनगरात प्रभागनिहाय निवडणुकांसाठी भाजप आग्रही आतापर्यंत ज्या ठिकाणी प्रभाग रचनेनुसार निवडणुका झाल्या त्या ठिकाणी भाजपला यश आले, तर शिवसेनेने वॉर्डनिहाय निवडणूक घेण्यासाठी आग्रह धरला होता. संभाजीनगर मनपात ११५ वॉर्ड असून त्यापैकी ५६ वॉर्ड हिंदूबहुल असून या ठिकाणी शिवसेना, भाजपला यश मिळाले आहे, तर ३५ वॉर्डांमध्ये मुस्लिम मतदार जास्त असल्याने एमआयएम, काँग्रेस यांची लढत होते, तर १५ वॉर्डांमध्ये दलितबहुल मतदार संख्या निर्णायक ठरत होती.
५० हजारांपर्यंत एका प्रभागाचे मतदार जाऊ शकतात.. मोठ्या महापालिकांचा विचार केला तर यापूर्वी चार सदस्य प्रभाग रचना करताना सर्वसाधारणपणे लोकसंख्या ४० ते ५० हजारांपर्यंत गृहीत धरली गेली होती. मागील तेरा वर्षांमध्ये लोकसंख्येमध्ये साधारणपणे दुप्पट वाढ झाली आहे. दुसरीकडे मतदारांची संख्यादेखील वाढली असल्यामुळे या सर्वांचा परिणाम म्हणून मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मिनी विधानसभा निवडणूकच ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.