
विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत आहेत..मात्र यातून आगामी निवडणुकीतही ते एकत्र येऊ शकतात असे आडाखे बांधले जात आहेत. यामुळं शिंदे गट आणि भाजपची ताकद असलेल्या संभाजीनगरात आणि मराठवाड्यात मोठा फरक पडेल असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
आतापर्यंत वेगवेगळे दिसणारे आणि कशासाठीही एकत्र न येणारे हे झेंडे शनिवारच्या सभेत मात्र एकत्र डौलाने फडकणार आहेत…हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेले ठाकरे बंधू आता मेळाव्याच्या रूपात एकत्र सभा गाजवणार आहेत. त्यांचं एकत्र येणं एक नव्या राजकीय समीकरणाची नांदी म्हणावी लागेल आणि त्याचे पडसादही आगामी काळात दिसणार आहे.. खासकरून संभाजीनगरमध्ये याचे निश्चित पडसाद दिसतील आणि त्याचं कारण म्हणजे आतापर्यंत शिवसेनेचं असणार जड पारडं. शिवसेना ही संभाजीनगर आणि मराठवाड्यात नेहमीच वरचढ राहिली आहे.राज ठाकरेंच्या सभेलाही संभाजीनगरसह मराठवाड्यात मोठी गर्दी होते.त्यावेळेस राज ठाकरेंचा शिवसेना हाच सर्वात मोठा राजकीय शत्रू राहिलाय.राज ठाकरेंची गर्दी जमवण्याची क्षमता आणि शिवसेनेची असलेली संभाजीनगरची मतं निश्चितपणे सत्ताधाऱ्यांना फेस आणणारी ठरू शकते.
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीत मोठा फायदा होईल असं दोन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते सांगताहेत.
दोघांच्या एकत्र येण्यानं मतांची गोळाबेरीज दोघांसाठीही वेगानं बदलणारी ठरणार आहे..संभाजीनगरसह मराठवाडा हा ग्रामीण भाग नेहमीच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे आलाय.त्यामुळेच शिवसेना इथं वाढली आणि जिंकली…त्यात संभाजीनगरात मनसेची पाटी कोरी असली तरी राज ठाकरेंना मानणारा वर्ग आहे. त्यांच्यासाठी जमणारी गर्दी आणि शिवसेनेची असणारी मतांची बँक हा मोठा फरक करू शकते. बाळासाहेब ठाकरेंचं मराठवाड्यात मोठं वलय आहे..त्यामुळे दोन्ही भावांचं एकत्र येणं निश्चितपणे दोन्ही नेत्यांसाठी आणि दोघांच्या पक्षासाठी फलदायी ठरेल अशी चिन्ह आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.