
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या प्राध्यापक भरती घोटाळ्याची बातमी ‘दिव्य मराठी’ने पुराव्यासह प्रसिद्ध करताच शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, ‘या प्रकरणाची शासकीय पातळीवर चौकशी करावी. हा फौजदारी गुन्हा आहे. त्य
.
‘प्राध्यापक भरतीमध्ये अर्ज न केलेल्या उमेदवाराची थेट निवड करून निवड समितीने शिक्षण क्षेत्राला काळिमा फासली आहे. हा विद्यार्थी आणि रुग्णांच्या जीवाशीही खेळ असून, तो इथेच थांबवावा. हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे अन्यथा आंदोलन छेडू,’ असा इशाराही बामुक्टो, एसएफआय, भाविसे या संघटनांनी दिलाय.
नेमके प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले गेले. त्यात 4 उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र, तर 3 उमेदवारांना अपात्र ठरवले. त्यानुसार मुलाखतीसाठी चार पात्र डॉक्टरांनाच बोलावणे अपेक्षित होते. मात्र, 13 नोव्हेंबर रोजी या पात्र डॉक्टरांसोबतच या पूर्ण प्रक्रियेत साधा अर्जही न केलेल्या डॉ. मेहुल शहा यांना सुद्धा बोलावले. विशेष म्हणजे त्यांना या मुलाखतीत सर्वाधिक 68 गुण देत थेट सहाय्यक प्राध्यापकपदी निवडही केली. त्यामुळे या साऱ्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दिव्य मराठीने हे प्रकरण समोर आणताच शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आंदोलन छेडण्याचा इशारा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालीयन प्राध्यापक संघटनेने (बामुक्टो) या प्रकरणी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. बामुक्टो प्राध्यापक संघटनेचे महासचिव प्रा. मारोती तेगमपुरे म्हणाले की, ‘छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापकाची भरती ही सर्व नियम पायदळी तुडवून केलेली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांचा नैसर्गिक हक्क हिरावण्यात आला आहे. या उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी या भरती प्रक्रियेत जे-जे दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा बामक्टो प्राध्यापक संघटना या प्रकरणी आंदोलन छेडेल. सेवेत गुणवान प्राध्यापक आले पाहिजेत. रुग्णांना सुद्धा चांगले डॉक्टर मिळाले पाहिजेत. कसलीही प्रक्रिया न पाळता प्राध्यापकपदी निवड करणे ही विद्यार्थी आणि रुग्ण दोघांचीही फसवणूक आहे.’

‘सुमोटो’ दखल घ्यावी
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ म्हणाले की, ‘वैद्यकीय क्षेत्रात सर्वांनी अगदी कटाक्षाने नैतिकता जपली पाहिजे. कारण येथे शिकवणारा प्राध्यापक, त्याच्या हाताखाली घडणारे विद्यार्थी यांचा हजारो, लाखो रुग्णांशी संपर्क येतो. ही भरती अशी चुकीची होत असेल, तर या रुग्णांच्या जीवाशी हा खेळ आहे. सर्वोच्च न्यायालयाने उमादेवी प्रकरणात अशा प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशा सूचना केल्यात. त्याचे या प्रकरणात पालन व्हावे. शासनाने स्वतः सुमोटो ॲक्शन घेत कारवाई करावी. न्यायालयानेही या अतिशय भंयकर प्रकरणाची सुमोटो दखल घेत पात्र विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.’

फौजदारी दाखल करा
बामुक्टो प्राध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य उमाकांत राठोड म्हणाले की, ‘शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक भरतीत प्रंचड मोठा घोटाळा झाल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले. या प्रकरणाची शासकीय पातळीवर चौकशी झाली पाहिजे. प्राध्यापक भरती करणारी निवड समिती आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे डीन या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे. हा फौजदारी गुन्हा आहे. ज्या उमेदवाराने अर्जच केला नाही, त्याची तुम्ही निवड करता. हे विद्यार्थी आणि रुग्ण दोघांशीही खेळ आहे. या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी.’

वशिला आणि पैसा
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अरुण मते म्हणाले की, ‘कुठलिही भरती प्रक्रिया ही पारदर्शक आणि मेरीटनुसार व्हावी. अर्ज मागवणे, त्यांची छाननी आणि त्यानंतर मुलाखत. इथे तर पात्र उमेदवार स्वतः जाहीर करून अर्जही न केलेल्या विद्यार्थ्याची निवड करण्याचा प्रकार घडला. वशिला आणि पैसा याच्या जोरावर ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. ही सारी प्रक्रिया पुन्हा नव्याने कराी. पात्र उमेदवाराची त्या जागी निवड करावी. आणि या प्रकरणातले दोषी निवड समिती आणि डीन या दोघांवरही तातडीने कारवाई करावी, अन्यथा विद्यार्थी संघटना गप्प राहणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने हे प्रकरण तडीस लावू,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पूर्ण घोटाळा 7 मुद्यांमध्ये…
1) शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठीची जाहिरात 27 ऑक्टोबर 2025 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली. मुखशल्य चिकित्सशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापकपदाची एक जागा, तर सामाजिक दंतशास्त्र पदाच्या दोन जागा होत्या. सर्व जागा कंत्राटी पद्धतीने 364 दिवसांसाठी भरणार असल्याचे जाहीर केले होते.

2) अर्ज करायची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2025 होती. याची 12 नोव्हेंबर 2025 रोजी सात उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानुसार डॉ. श्रुती पुंडकर, डॉ. कुणाल देशमुख, डॉ. पल्लवी दिवेकर, डॉ. नेहा शेंडे यांना पात्र ठरवत मुलाखतीला बोलावले, तर डॉ. मनीषा राठोड, डॉ. नम्रता राठोड, डॉ. आनंद गायकवाड यांना अपात्र ठरवले.
3) विशेष म्हणजे या साऱ्या प्रक्रियेची यादी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या पदभरती निवड समितीने संकेतस्थळावर टाकली. त्यात 4 उमेदवारांसमोर मुलाखतीसाठी पात्र, तर 3 उमेदवारांच्या समोर मुलाखतीसाठी अपात्र असे स्पष्ट लिहिण्यात आले. या यादीवर निवड समितीचे अध्यक्ष, सचिव आणि डीनच्या सह्या आहेत.

4) चार पात्र उमेदवारांमध्ये डॉ. श्रुती राजेंद्र पुंडकर, डॉ. कुणाल शंकरराव देशमुख, डॉ. पल्लवी गोरखनाथ दिवेकर आणि डॉ. नेहा अशोक शेंडे यांची नावे होती. तर तीन अपात्र उमेदवारांमध्ये डॉ. मनीषा दिगंबरराव राठोड, डॉ. नम्रता पंडित राठोड आणि डॉ. आनंद पंडित गायकवाड यांचे नाव होते.
5) मुलाखतीसाठी पात्र 4 डॉक्टरांनाच बोलावणे अपेक्षित होते. मात्र, 13 नोव्हेंबर रोजी या पात्र डॉक्टरांसोबतच या पूर्ण प्रक्रियेत साधा अर्जही न केलेल्या डॉ. मेहुल शहा यांना सुद्धा बोलावण्यात आले. विशेष म्हणजे त्यांना या मुलाखतीत सर्वाधिक 68 गुण देत थेट सहाय्यक प्राध्यापकपदी निवडही केली. त्याची अंतिम निवड यादी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केली.

6) अंतिम निवड यादीत डॉ. मेहुल शहांना दुसऱ्या स्थानी ठेवले, तर पहिल्या स्थानी कमी 64 गुण मिळवणाऱ्या डॉ. श्रुती पुंडकर यांचे नाव टाकले. रितसर अर्ज करून मुलाखत देणाऱ्या डॉ. पल्लवी दिवेकर यांना 60 आणि डॉ. नेहा शेंडे यांना 50 गुण देत वेटिंग लिस्टवर ठेवले. विशेष म्हणजे ही यादी सुद्धा संकेतस्थळावर टाकली.
7) अंतिम निवड यादीवर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या डीन डॉ. एम. एस. इंदूरकर यांची सही व शिक्का आहे. या निवड समितीच्या अध्यक्ष डॉ. प्रज्ञा बनसोडे होत्या. तर सचिव डॉ. अशोककुमार बन्साळी होते. इतर सदस्यांत डॉ. एम. एस. इंदूरकर, डॉ. जगदीशचंद्र वठार, डॉ. कांचन शहा, डॉ. स्मिता खालीकर, डॉ. राकेश मोहोडे आहेत.
संबंधित वृत्त
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



