
विशाल करोळे (प्रतिनिधी) संभाजीनगर : संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना क्या हुआ तेरा वादा असा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय. वर्षभरापूर्वी पालकमंत्री शिरसाट यांनी या वसतिगृहाची पाहणी करत दूरवस्थेवरुन अधिका-यांना धारेवर धरलं होतं. मात्र वर्ष झालं तरी संभाजीनगरच्या समाजकल्याण वसतिगृहाची दूरवस्था कायम आहे.
समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहाबाहेर विद्यार्थ्यांनी असा ठिय्या मांडला होता. त्याला कारणही तसंच होतं. वसतिगृहातील एक नंबरच्या मेसमध्ये गवारच्या भाजीमध्ये विद्यार्थ्यांच्या ताटात मृत पाल आढळली. यामुळे 28 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. वसतीगृहातील हा प्रकार नवा नव्हता. या आधीही सडकी फळं, पोह्यांमध्ये झुरळ, अळ्या आढळून आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. गंभीर बाब म्हणजे सामाजिक न्यायमंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वर्षभरापूर्वीच या वसतीगृहाची पाहणी केली होती. वसतिगृहाच्या दूरवस्थेवरुन अधिका-यांना धारेवर धरलं होतं. मात्र वर्ष उलटल्यानंतरही वसतिगृहातील परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नाहीये.
यासंदर्भात झी २४तासनं थेट पालकमंत्री संजय शिरसाटांना गाठलं. आणि वसतीगृहाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. यावर दोषींवर कठोर कारवाई करु असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र त्याच्या या आश्वासनावर विरोधकांनी चांगलीच टीका केलीये.
संभाजीनगर वसतीगृहाच्या या घटनेवर अद्याप कोकणतीही कारवाई झालेली नाहीये. तोच संजय शिरसाटांनी आणखी एक आश्वासन दिलंय. परभणीच्या पाथरी नगरपरिषदेच्या प्रचारादरम्यान त्यांनी मुलींच्या वसतीगृहासाठी 25 कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिलंय. एखाद्या थ्री स्टार हॉटेलप्रमाणे हे वसतीगृह असेलं असा दावा त्यांनी केलाय.
एकीकडे संजय शिरसाट नवनवी आश्वासनं देत सुटलेत. तर दुसरीकडे वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांना पाणी, जेवण अशा मुलभूत सुविधांसाठी झगडावं लागतंय. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांना वसतिगृह अधिकारी जुमानत नाहीत का असा सवाल उपस्थित होतो आणि म्हणूच क्या हुआ तेरा वादा असा सवाल शिरसाटांना विचारण्याची वेळ आलीये.
FAQ :
संभाजीनगर वसतीगृहात काय झाले?
संभाजीनगर वसतीगृहात गवारच्या भाजीमध्ये मृत पाल आढळल्याने 28 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काय आश्वासन दिले?
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
सतीगृहातील समस्या काय आहेत?
वसतीगृहातील समस्या म्हणजे सडकी फळं, पोह्यांमध्ये झुरळ, अळ्या आढळून आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



