
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशन या संघटनेकडून हल्ला झालेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. संभाजी ब्रिगेडने आजपर्यंत जात वर्चस्वाला प्राधान्य दिले, हिंसाचा
.
हाकेंची नेमकी पोस्ट काय?
ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी पोस्टकरत म्हटलंय की, संभाजी ब्रिगेड ने जे पेरले तेच उगवले. ……. संभाजी ब्रिगडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो. कोणतीही मागणी, मांडणी, वैचारिक लढाई संविधानाच्या चौकटीत झाली पाहिजे. या मताचा मी आहे मात्र ही चौकट मोडून रस्त्यावर दहशत माजवण्याच्या अनेक घटना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घडल्या आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची तोडफोड, वाघ्याचे स्मारक उखडून दरीत फेकणे, गडकरींचा पुतळा उध्वस्त करणे, शाईफेक करणे, फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या समाजिक चळवळी बदनाम करणे, उपेक्षितांच्या लढा लढणाऱ्यांच्या गाड्या फोडणे, अशा शेकडो घटना आहेत. ब्रिगेडने हिंसाचाराचं सामान्यीकरण केलं. हिंसाचार माजवणाऱ्यांचे खुले सत्कार केले, बक्षिसं जाहीर केली. आता ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांवर ही वेळ आली. उपेक्षित आणि विस्थापितांच्या विकासनवाटेवर बाभळ पेरण्याच काम ब्रिगेडनं केलं. तेच काटे ब्रिगेडच्या वाट्याला आलेत. पेरलं ते उगवलं यालाच म्हणतात.
जमीनी कुणी लाटल्या?
लक्ष्मण हाके यांनी पोस्टकरत म्हटलंय की, संभाजी ब्रिगडने पुरोगामीत्वाची झुल ओढून, जात वर्चस्वाची भावना निर्माण करण्याचे काम केले. यासाठी ब्राम्हण ना शिव्या घालणे आणि बहुजन बहुजन म्हणून डांगोरा पिटणे, महाराष्ट्राच्या गावगाड्यात कधी माळी तर कधी धनगर तर कधी वंजारी समाजाला गेली 2 दशकं टार्गेट केलं जातंय, बलुते अलुते तर लोकशाहीच्या कोणत्या घरात राहतात हे अजून कळलेले नाही. गावगाड्यात आत्ता ब्राह्मण उरला नाही तर टार्गेट कुणाला करायचं, गुरवांची दिवा बत्ती ची वतनी जमीन, रामोशी वतन, माझ्या दलित बांधवांच्या गावाकूसा बाहेरच्या जमिनी गावोगावी कुणी लाटल्या, प्रवीण गायकवाड नेहमी समता मुलक समाज म्हणतात मग जरांगे ओबीसी आरक्षण उध्वस्त करायला निघाले त्यावर ते काहीच बोलत नाहीत. बलुतेअलुते,भटक्या विमुक्त जातीजमाती मध्ये मराठा सामील झाला तर कसा समता मुलक समाज निर्माण होईल ? जरांगेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आयाबहिणीवरून शिव्या दिल्या त्याच्याबद्दल ब्र शब्द संभाजी ब्रिगेडने कधी काढला नाही. उलट जरांगेंविरोधात वास्तव मांडणाऱ्या डॉक्टराच्या अंगावर शाई फेकली. बहुजन बहुजन म्हणून मराठेत्तरांचा फक्त वापर करण्यात आला. ओबीसी आरक्षणावर टाच येत असताना ओबीसी ची भूमिका घेणाऱ्या लक्ष्मण हाकेवर पुण्यात एकटं गाठून हल्ला करण्यात आला तो जीवघेणा नव्हता काय? तो कोणी केला होता? ओबीसी म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या बाजूने जर संभाजी ब्रिगेड कधी उभी राहिली असती तर खऱ्या अर्थाने ती फुले, शाहु, आंबेडकरांचा वारसा जपणारी संघटना आहे. असे म्हणता आले असते.
ब्रिगेडने वतनदारांना सत्तेत बसवण्यासाठी काम केले
लक्ष्मण हाके यांनी पोस्टकरत म्हटलंय की, 2016- 2017 ला ॲट्रोसिटी रद्द करण्याचे मोर्चे जेव्हा निघाले तेव्हा ब्रिगेडचा खुला पाठिंबा या मोर्चांना होता. धनगर कीर्तनकाराला मारहाण झाली, दलितांना गावातून बहिष्कृत करण्यात येतं. तेव्हा ब्रिगेड तिथं पोहचून जातआंधळ्या बंधुभावकीची समजूत काढताना कधी दिसली का? रयत शिक्षण संस्थेवर दलित, ओबीसी, मायक्रो ओबीसींचे प्राध्यापक आरक्षणाप्रमाणे असावेत म्हणून कधी आवाज उठवल्याचं पाहिलं का? या प्रश्नाची उत्तरं शोधल्यास ब्रिगेडचं खरं रुप आपणास उमजेल. बहुजन बहुजन म्हणायचं आणि सरदार वतनदार यांना सत्तेत बसवण्यासाठी कुटील डाव खेळायचे काम ब्रिगेड ने केले आहे. आत्ता म्हणे शेवटाची सुरुवात ती कशी असते बरं आलटून पालटून नेहमी सत्तेत बसणे ही आहे का शेवटाची सुरुवात? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.