digital products downloads

संसदीय कारकीर्दीच्या साठाव्या वर्षांत पदार्पण करणारा महाराष्ट्रातील नेता, बापासाठी लेकीची भावनिक पोस्ट!

संसदीय कारकीर्दीच्या साठाव्या वर्षांत पदार्पण करणारा महाराष्ट्रातील नेता, बापासाठी लेकीची भावनिक पोस्ट!

Supriya Sule On Sharad Pawar: शरद पवार संसदीय कारकीर्दीच्या 60 वर्षांच्या निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट केली आलीय. या पोस्टमध्ये त्यांनी वडिलांच्या दीर्घ राजकीय प्रवासाचे स्मरण करत जनतेच्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

शरद पवार साहेबांच्या संसदीय कारकीर्दीचे आज साठावे वर्ष सुरू झाले आहे. गेल्या सहा दशकांत त्यांनी महाराष्ट्र आणि देशातील अनेक मोठ्या राजकीय घडामोडी पाहिल्या आहेत. या काळात त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी सतत आवाज उठवला. त्यांचा हा प्रवास आजही पूर्ण जोमाने चालू आहे. सुप्रिया सुळे यांनी या निमित्ताने वडिलांच्या या यशस्वी आणि प्रेरणादायी कारकीर्दीचे कौतुक केले आहे.

लोकसभेत तब्बल सात वेळा

शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून सहा वेळा निवडून येऊन शपथ घेतली. एकदा ते विधानपरिषदेचे सदस्य म्हणूनही काम केले. लोकसभेत ते तब्बल सात वेळा निवडून गेले. राज्यसभेत दोन वेळा त्यांचे प्रतिनिधित्व झाले. अशा प्रकारे वेगवेगळ्या सभागृहांत त्यांनी जनतेची सेवा केली. या सर्व निवडणुका त्यांच्या लोकप्रियतेचे आणि मेहनतीचे पुरावे आहेत.

त्यांचा संसदीय प्रवास 1967 साली आजच्या दिवशी सुरू झाला होता. त्या दिवशी त्यांनी प्रथम शपथ घेतली आणि राजकारणात पदार्पण केले. गेल्या 60 वर्षांत त्यांनी कधीही थांबले नाहीत. सतत जनतेच्या भल्यासाठी काम केले. हा अविजीत आणि अखंड प्रवास आजही सुरू असल्याचे सुप्रिया सुळे यांनी अभिमानाने सांगितले आहे.

या दीर्घ प्रवासात शरद पवार यांचे जीवाभावाचे साथीदार, मेहनती कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचे मायबाप जनता सदैव त्यांच्या सोबत उभी राहिल्याचे सुळे यांनी सांगितले. जनतेने त्यांच्यावर अलोट प्रेम केले आणि प्रचंड विश्वास टाकला. या पाठिंब्यामुळेच त्यांना इतका मोठा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करता आला. सुप्रिया सुळे यांनी या सर्वांच्या योगदानाचे कौतुक केले.

पोस्टमध्ये काय?
शरद पवार यांनी या सर्व जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या आणि साथीदारांच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीय. शरद पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत निवडून गेले तर दोन वेळा त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले आहे. सन 1967 साली आजच्या दिवशी सुरू झालेला हा अविजीत प्रवास आजही अव्याहतपणे सुरु आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे जीवाभावाचे सोबती, कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायबाप जनता ठामपणे उभे राहिले. जनतेने आदरणीय त्यांच्यावर अलोट प्रेम केले, प्रचंड विश्वास टाकला. या विश्वासाच्या बळावरच हा प्रवास शक्य झाला आहे. याबद्दल या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार, अशा शब्हात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

कशी आहे तब्येत?
शरद पवार यांच्या तब्येतीनुसार ताजी अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांना केवळ रूटीन चेकअप साठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या आधीचा 10 दिवसांचा औषधांचा कोर्स संपल्याने त्यांना नॉर्मल चेक अप साठी रुग्णालयात नेण्यात आल आहे.. शरद पवार यांची तब्येत एकदम व्यवस्थित आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp