digital products downloads

संसदेत मोठा गदारोळ: डॉ. प्रशांत पडोलेंसह 6 विरोधी खासदारांचे निलंबन; सभागृहात कागद फाडून भिरकावल्याचा ठपका – Nagpur News

संसदेत मोठा गदारोळ:  डॉ. प्रशांत पडोलेंसह 6 विरोधी खासदारांचे निलंबन; सभागृहात कागद फाडून भिरकावल्याचा ठपका – Nagpur News



संसदेच्या चालू अधिवेशनात आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. सभागृहाच्या शिस्तीचे उल्लंघन आणि गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत भंडारा-गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोले यांच्यासह विरोधी पक्षाच्या एकूण ६ खासदारांना उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. ​सभागृहाचे कामकाज सुरू असताना विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला होता. यादरम्यान काही सदस्यांनी थेट वेलमध्ये धाव घेतली. सभापतींच्या समोरील सचिवांच्या टेबलापर्यंत जाऊन कागद फाडणे आणि ते कागद अध्यक्षांच्या आसनाकडे भिरकावल्याने सभागृहातील वातावरण तापले होते. आणि भंडाऱ्याचे खासदार डाँ. प्रशांत पडोळे यांच्यासह मणिकम टागोर, अमरिंदर सिंह राजा वारींग, गुरजीत सिंह औजला, डीन कुरियाकोस, किरण कुमार रेड्डी या खासदारांना निलंबीत करण्यात आल. ​संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या खासदारांविरुद्ध नियम ३७४(२) अंतर्गत निलंबनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात नमूद करण्यात आले की, संबंधित सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या अधिकाराचा अवमान केला असून सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचवली आहे. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि या सर्व खासदारांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दरम्यान भंडाऱ्यात या घटनेचे पडसाद उमटले असून, नव्याने निवडून आलेले खासदार प्रशांत पडोले यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp