
महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जनजागृती समिती, स्वयंभू महादेव मंदिर अंत्री मलकापूर अकोला श्री चंडिका देवी संस्थान कुरणखेड अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी २८ मार्च २०२५ रोजी स्वयंभू महादेव मंदिर अंत्री मलकापूर अकोला “महाराष्ट्र मंदिर-न्यास अ
.
याप्रसंगी कुरणखेड येथील श्री चंडिकादेवी संस्थानचे विश्वस्त प्रशांत देशमुख, अंत्री महादेव संस्थानचे अरविंद देठे, अकोट येथील कान्होबा महाराज संस्थानचे पंकज श्रीवास्तव, मुंडगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचे महेश गाडे, श्री गजानन महाराज विहीर संस्थान निळकंठ लांडे, हिंदू जनजागृती समिती विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर इत्यादी उपस्थित होते.
अकोला शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी मंदिर विश्वस्तांच्या एकत्रित बैठकांचे आयोजन करून ४०० हून अधिक मंदिरांना या अधिवेशनाचे महत्व सांगून निमंत्रण देण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने भारतभरात मंदिरांचे संगठन करण्याचे कार्य सुरु आहे.
या माध्यमातून महाराष्ट्रात मंदिरांचे मोठे संगठन उभे झाले आहे. आज देशात प्रमाणात मंदिरांवर आघात होत आहेत. मंदिरे सरकारीकरण करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो आहे आणि देवनिधी लुटला जातो आहे. मंदिरे ही हिंदू धर्माची शक्तिकेंद्रे आहेत, मंदिरे भक्तांच्या स्वाधीन असावी, मंदिर संस्कृतीचे रक्षण व्हावे, मंदिरे ही केवळ दर्शनापुरती मर्यादित न राहता ती हिंदू धर्म शिक्षणाची केंद्रे व्हावीत, हिंदूंच्या मंदिरातील देव निधी हिंदू धर्माच्या प्रसारासाठी, रक्षणासाठी वापरला जावा यासर्व विषयावर अधिवेशनात चर्चा होणार आहे. यावेळी अश्विनी सरोदे, अमोल वानखडे, अधिवक्ता श्रुती भट तसेच अन्य मंदिरांचे विश्वस्त विठ्ठल पातोंड, राजू इंगळे, दीपक पुरी, प्रशांत पाटील, संजय बकाल, श्री गजानन वारकरी इत्यादी उपस्थित होते.
मंदिरांच्या रक्षणासाठी अधिवेशन मंदिर महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची भूमी घोटाळेबाजांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्यात आली आहे, तसेच कर्नाटकमध्ये ‘मंदिर अन् धर्मादाय संस्था कर सुधारणा विधेयक २०२४’ रोखण्यात यशही मिळवले आहे. पंधरा हजाराहून अधिक विश्वस्त, पुजारी आणि धार्मिक संस्था यांचे संघटन, आठशेहून अधिक मंदिरांमध्ये “वस्त्रसंहिता’ लागू करण्यात आली आहे. मंदिरांचे सरकारीकरण थांबवण्यासाठी न्यायालयीन याचिका दाखल आदी कार्य करण्यात आले आहे. मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांच्या रक्षणासाठी आणि हिंदू संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याची भूमिका यावेळी आयोजकांकडून मांडण्यात आली. हिंदू मंदिरांचे भवितव्य ठरवणारे ऐतिहासिक अधिवेशन असणार आहे. सर्व मठ-मंदिर विश्वस्त, पुजारी यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.