
मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत ‘शोले’ चित्रपटातील “कितने आदमी थे…” हा प्रसिद्ध डायलॉग अमजद खान यांना नीट बोलता येत नव्हता, असा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, अमजद खान जेव्हा हा डायलॉग बोलत होते, तेव्हा
.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सचिन पिळगावकर यांना त्यांच्या या मुलाखतीवरून डिवचले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले, शोले हा सिनेमा 1975 साली रिलीज झाला. त्यावेळी सिनेरसिकांनी शोले सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यातील एक-एक डायलॉग त्यावेळच्या पिढीच्या तोंडावर होता. डाकू, दरोडेखोर यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग जेवढा गाजला, मला नाही वाटत तेवढा कोणता अभिनेता दरोडेखोराच्या भूमिकेमध्ये गाजला असेल.
गब्बरसिंग अन् अमजद खान ही हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर नावे आहेत. पण, हे काही मनाला पटले नाही की, गब्बरसिंग म्हणजेच अमजद खान यांना डायलॉग फेकण्याचे कौशल्य- आदब हे त्या सिनेमातील बालकलाकार सचिन पिळगावकर याने शिकवली. कारण, अमजद खान यांचे वडील झकारिया खान अर्थात जयंत हेदेखील 1950-60 च्या दशकातील नामांकित अभिनेते होते. म्हणजेच चित्रपटसृष्टीत खानदान असलेल्या अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी, हे पचनी पडतच नाही. आज अमजद खान आपल्यात नाहीत आज ही जो कोणी शोले बघेल तो अमजद खान म्हणजेच गब्बर सिंगला विसरूच शकत नाही.
काय म्हणाले होते सचिन पिळगावकर?
सचिन पिळगावकर यांनी मुलाखतीत म्हटले होते की, शोले सिनेमा आल्यानंतर अनेकांना असे वाटले की, अमजदचा आवाज हा गब्बर सिंहचा आवाज वाटत नाहीय. तो थोडासा पातळ वाटतोय. त्याला मी माईकसमोर उभे केले आणि आमचे सूद नावाचे तेव्हा रेकॉर्डिस्ट होते, असिस्टंट होते ते मंगेश देसाईंचे. त्यांना सांगितले ट्रेबल एकदम बंद करदो और बेस बढादो. मी अमजदला सांगितले माईकच्या जवळ उभा राहा, आणि वरच्या पट्टीत नको बोलूस खालच्या पट्टीत बोल. कारण माझ्यामागे तो अनुभव होता, जो अमजदच्या मागे नव्हता आणि पहिला डायलॉग “कितने आदमी थे…” आधी त्याने वरच्या पट्टीत ओरडून म्हटलेले. मी त्याला सांगितले नाही, असे नाही. नीचे के सूर मे बोल. पट्टी पुरी नीचे कर. कारण मी गायक सुद्धा आहे. मला ऑक्टिम्स कळतात. त्यामुळे खालच्या सुरात बोल, कितने आदमी थे, असे सचिन पिळगावकर यांनी म्हटले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.