
- Marathi News
- National
- Mother’s Mantra For Children… If Someone Asks You To Come With Them, Ask For The Password First, Don’t Go With Strangers, Mother Gives Password To Children
जगदीश विजयवर्गीय | जयपूर4 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
- अशा गोष्टींचा धोका : ट्रॉफी, खेळणी देईन किंवा तुझी आई बोलावतेय…
बऱ्याचदा लहान मुले अनोळखी लोकांच्या जाळ्यात अडकून त्यांच्यासोबत जातात. त्यांच्या संरक्षणासाठी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील माता त्यांच्या मुलांना पासवर्ड देत आहेत. ते मुलांना असे आकडे किंवा शब्द सांगतात जे त्यांना सहज लक्षात राहतील व कुणाला कळणार नाहीत. एखादा अनोळखी किंवा ओळखीचा व्यक्ती तुम्हाला सोबत चलण्यास सांगेल तेव्हा त्याला प्रथम पासवर्ड विचारा. जर ती व्यक्ती पासवर्ड सांगू शकली नाही तर ती व्यक्ती खोटे बोलतेय. यानंतर पळून जा किंवा ओरड करा.
पासवर्डचे हे चलन २०१७ मध्ये जयपूरची संस्था इनाया फाउंडेशनच्या पुढकाराने राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातून सुरू झाले. संस्थेच्या सचिव नितीशा शर्मा म्हणाल्या की, सरकारच्या मोहिमेचा एक भाग म्हणून झालावाडमधील जिल्हा प्रशासनाने ‘गुड टच-बॅड टच’ कार्यक्रम आयोजित केला होता. तेथे मला ते कळले. कारण लहान मुलांकडे मोबाइल फोन नसतात. गावांमध्ये आणि शहरांमध्ये शाळा अनेक किलोमीटर अंतरावर आहेत. अशा परिस्थितीत अज्ञात लोकांकडून धोका असतो. संस्थेने तेथील मातांना त्यांच्या मुलांना पासवर्ड देण्याचे सुचवले. पासवर्ड एकदा उपयोगी पडला की तो बदला. झालावाडमधील प्रतिसादानंतर, संघटनेने राजस्थानसह उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने नारी चौपालचे आयोजन केले आणि मातांना जागरूक केले. गेल्या ८ वर्षांत संस्थेने या राज्यांतील १८ जिल्ह्यांतील ३.५ लाख मातांना पासवर्ड मोहिमेशी जोडले. यात अंगणवाडी सेविका, शालेय मुलांच्या माता, चालक-मजूर महिलांचा समावेश आहे.
स्टाॅल लावून जागृती निर्माण केली.
अलवरमधील नारी चौपालला पासवर्डसाठी एक नाटक सादर केले. यात आई आणि मुलीमधील संभाषणाद्वारे पासवर्ड कसा तयार करायचा आणि तो कसा वापरायचा हे समजावून सांगितले.
या धड्यातून काय शिकलात : कोणावरही विश्वास ठेवू नका.
प्रकरण-१ : उदयपूरमधील मावली येथे मार्च २०२३ मध्ये एका तरुणाने ८ वर्षांच्या मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने फूस लावून नेले. तिच्यावर अत्याचार करून हत्या केली.
प्रकरण-२ : सप्टेंबर २०२४ मध्ये अलवरमधील राजगडला एका भाडेकरूने ५ वर्षांच्या मुलीला वस्तू देण्याच्या बहाण्याने पळवून नेत अत्याचार केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.