digital products downloads

सताऱ्यातील माणगंगा दुथडी भरून वाहू लागली: म्हसवडमध्ये नागरिकांना सावध राहण्याचा इशारा, दवंडी पिटवत घराबाहेर न पडण्याचे आवाहन – Kolhapur News

सताऱ्यातील माणगंगा दुथडी भरून वाहू लागली:  म्हसवडमध्ये नागरिकांना सावध राहण्याचा इशारा, दवंडी पिटवत घराबाहेर न पडण्याचे आवाहन – Kolhapur News



सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कराड, पाटण, महाबळेश्वर, जावली या तालुक्यात अवकाळी पाऊस थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यातच आज माण व फलटण तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. दुष्काळी माण तालुक्यातील माणगंगा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी सतत वाढत असताना दिसत आहे. त्यामुळे म्हसवड नगरपालिकेने अक्षरशः दवंडी पिटवून नागरिकांना सतर्क राहण्याचे व घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सतंतधार पावसामुळे माण नदी पात्रातील सर्व बंधारे भरुन माण नदी ऐन उन्हाळ्यात वाहू लागली आहे. म्हसवड येथील यात्रा मैदान जवळच्या माण नदी पात्रातील बंधारा भरुन वाहत आहे. या नदीवरील आंधळी धरण भरुन वाहू लागल्यामुळे म्हसवड परिसरात आज रात्री पुराचा धोका संभवत आहे. आंधळी धरण पुर्ण भरुन सांडव्यातून पाणी वाहू लागताच माणचे तहसीलदार विकास अहिर यांनी धरणास भेट देऊन पाहणी केली याबरोबरच म्हसवड येथेही भेट देऊन पुरजन्य स्थितीची माहिती घेतली. वाई तालुक्यातील मांढरदेव येथे घाटात दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे. सातारा जिल्ह्यातील घरांच्या पडझडीत वाढ झाली आहे. औषध आहे 71 व तीन घरे पुर्णतः पडली आहेत. एकूण नऊ रस्त्यावरील वाहतूक जिल्ह्यात पूर्णपणे बंद आहे. सुमारे दीडशे कोंबड्या या अवकाळी पावसामुळे मेल्या आहेत. तर नऊ जनावरे मरण पावली आहेत. दोन विहिरी खचल्या आहेत. 90 पोती कांद्याचे नुकसान झाले आहे. अद्यापही घाट रस्त्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतच आहेत.‌ तसेच पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खड्यांचे प्रमाण वाढल्याने व पडणाऱ्या पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सातारा तालुक्यातील ठोसेघर, एकीव, महाबळेश्वर आंबेनळी घाटातील छोटे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. कास ठोसेघरसह परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणावर रविवारी जाताना दिसत होते. माणगंगा नदीला पूर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp