digital products downloads

सत्कार सोहळ्यात‎ राजकीय टोलेबाजी‎: आमदार कर्डिले, राजळेंना मंत्री व्हायचेय;‎ माजी खा. विखे यांची पुनर्वसनाची मागणी‎ – Ahmednagar News

सत्कार सोहळ्यात‎ राजकीय टोलेबाजी‎:  आमदार कर्डिले, राजळेंना मंत्री व्हायचेय;‎ माजी खा. विखे यांची पुनर्वसनाची मागणी‎ – Ahmednagar News


विधानसभा निवडणुकीत विजयी ‎‎झालेल्या महायुतीच्या आमदारांच्या ‎‎सत्कार सोहळ्यात राजकीय‎ टोलेबाजी रंगली. त्यात आमदार ‎‎शिवाजी कर्डिलेंसह मोनिका राजळे ‎‎यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली. ‎‎सर्व आमदारांमध्ये मी एकटीच‎ लाडकी बहीण असल्याचा दावा ‎राजळे या

.

जिल्ह्यात विधानसभा ‎निवडणुकीत १२ पैकी महायुतीचे १०‎आमदार विजयी झाले. त्यांचा‎सत्कार जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आमदार शिवाजी कर्डिले यांच्या‎पुढाकारातून आयोजित करण्यात‎आला होता. यावेळी विधान‎परिषदेचे सभापती राम शिंदे,‎पालकमंत्री राधाकृष्ण विखे,‎आमदार मोनिका राजळे, आमदार‎संग्राम जगताप, आमदार काशिनाथ‎दाते, आमदार विठ्ठलराव लंघे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आमदार अमोल खताळ, आमदार‎ विक्रम पाचपुते आदी उपस्थित होते.‎

कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच‎ पदाधिकारी, नेत्यांच्या भाषणात‎ टोलेबाजी सुरू झाली. आमदार ‎संग्राम जगताप कार्यक्रमास काहीसे‎ उशिरा आले. यावर त्यांचे मेहुणे‎ अक्षय कर्डिले यांनी जावई असल्यामुळे बोलता येत नाही, अशी ‎टिप्पणी केली. त्याला उत्तर देताना आमदार संग्राम जगताप ‎म्हणाले, जावई असलो तरी पाच महिन्यांत प्रथमच माझा‎ सासऱ्यांकडून सत्कार होत आहे. आमदार राजळे यांनीही‎ यावर टिपण्णी केली. जावई शेजारीच असल्याने असे होते.‎जावई लांब जिल्ह्याबाहेर इतर कुठे असता तर त्याचे स्वागत ‎चांगल्या पद्धतीने झाले असते, असे त्या म्हणाल्या. कर्डिले‎यांनी अमोल खताळ यांचा उल्लेख ”जायंट किलर” असा‎केला. खताळ म्हणाले, मी प्रथमच आमदार झाल्याने सर्वात‎छोटा ”लाडका भाऊ” म्हणून आमचे प्रश्न मार्गी‎ लावण्यासाठी सहकार्य करावे.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp