
Irregularities in the voter list: विधानसभेतील दारुण पराभवानंतर विरोधकांनी बोगस मतदारांचा मुद्दा पुढे आणत रान पेटवून दिलं. काँग्रेस नेते राहुल गांधींनी तर थेट पुरावे देत आरोपांचा बॉम्बगोळा टाकला त्यानंतर राज्यातही जोरदार वातावरण तापलं.त्याला प्रत्युत्तर देताना निवडणूक आयोगासह सरकारची दमछाक झाली. असे असतानाच आता सत्ताधारी आमदारांनीही मतदार यादी घोळाचे आरोप केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं असून विरोधकांना त्यामुळे नवे बळ मिळालंय.
दुबार मतदान आणि मतदारयादीतील घोळावरून दोनच दिवसांपूर्वी मविआसह मनसे नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिका-यांची भेट घेतली होती.यावेळी विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती करत प्रक्रिया सुधारण्याची मागणी केली होती. बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आयोगासह सरकारला कोंडीत पकडले असतानाच आता काही सत्ताधारी नेत्यांनीही मतदार यादीतील घोळाबाबत आरोप करत चर्चेचा धुरळा उडवून दिलाय. संभाजीनगर, बुलढाण्यासह, नवी मुंबईतील नेत्यांनी मतदारयादीत घोळाचे आरोप केले आहेत. बुलढाण्यात 1 लाखापेक्षा अधिक बोगस मतदार असल्याचा दावा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला होता. त्या आरोपाला भाजप जिल्हाध्यक्षांनी दुजोरा दिलाय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी थेट पत्रकार परिषद घेत मतदार यादीत घोळाचा आरोप केलाय. गंगापूर मतदारसंघात 36 हजार बोगस मतदार असल्याचा दावा त्यांनी केलाय. तर नवी मुंबईच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी बोगस नावांसाठी निवडणूक अधिकारीच जबाबदार असल्याचा घणाघात केलाय.
दरम्यान सत्ताधारी नेतेच मतदार यादीतील घोळावर बोलू लागल्याने विरोधकांनी सरकारला खोचक टोला लगावलाय. हा प्रकार सगळीकडेच आहे मात्र निवडणूक आयोग या टाळाटाळ करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे
एकीकडे निवडणूक आयोगासह सरकार मतदारयाद्यांमध्ये घोळ नसल्याचा दावा करत आहे.मात्र सत्ताधारी नेत्यांकडूनच आता घोळाचे आरोप होऊ लागल्याने सरकार कोंडीत सापडल्याचे चित्र आहे.सत्ताधारी नेत्यांच्या आरोपांमुळे विरोधकांना आयताच नवा मुद्दा मिळाला आहे.
FAQ
प्रश्न: विधानसभा निवडणुकीनंतर बोगस मतदारांच्या मुद्द्यावर विरोधकांनी काय आरोप केले आहेत?
उत्तर: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारयादीत बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित करत पुरावे देऊन सरकार आणि निवडणूक आयोगावर आरोप केले. त्यानुसार, महाविकास आघाडी (मविआ) आणि मनसे नेत्यांनी दुबार मतदान आणि मतदारयादीतील घोळाबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रक्रिया सुधारण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे मतदारयादीतील गैरप्रकारांबाबत तक्रारही नोंदवली आहे.
प्रश्न: सत्ताधारी नेत्यांनी मतदारयादीतील घोळाबाबत काय दावे केले आहेत?
उत्तर: सत्ताधारी आमदारांनीही आता मतदारयादीतील घोळाचे आरोप करून वादाला नवे रूप दिले आहे. बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी १ लाखापेक्षा अधिक बोगस मतदार असल्याचा दावा केला, ज्याला भाजप जिल्हाध्यक्षांनी दुजोरा दिला. संभाजीनगरमधील राष्ट्रवादी आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर मतदारसंघात ३६ हजार बोगस मतदार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. नवी मुंबईतील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी बोगस नावांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे.
प्रश्न: सत्ताधारी नेत्यांच्या आरोपांमुळे विरोधकांना कसा फायदा झाला आहे आणि सरकारची भूमिका काय आहे?
उत्तर: सत्ताधारी नेत्यांच्या आरोपांमुळे विरोधकांना आयताक्रमाने नवा मुद्दा मिळाला असून, त्यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे की, हा घोळ सगळीकडे आहे पण निवडणूक आयोग टाळाटाळ करत आहे. सरकार आणि निवडणूक आयोग मात्र मतदारयाद्यांमध्ये घोळ नसल्याचा दावा करत आहेत. यामुळे सरकार कोंडीत सापडल्याचे चित्र आहे आणि विरोधकांनी आयोगावर प्रश्नांची सरबत्ती करण्यास सुरुवात केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.