
Sharad Pawar on Laxman Hake Allegations: मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ‘झी 24 तास’च्या टू द पॉईंट या कार्यक्रमातून मोठा आरोप केला आहे. जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी रसद पुरवल्याचा आरोप हाकेंनी केला आहे. तर हाकेंचे सर्व आरोप शरद पवारांनी फेटाळून लावले आहेत. उद्धव ठाकरेंचे आमदारही मराठ्यांना रसद पुरवतात. एकेका आमदाराने 10 ते 15 लाख रुपये दिल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी मुंबईत धडक देत विजयाचा गुलाल उधळला. दरम्यान जरांगे पाटलांच्या याच आंदोलनावरून झी 24 तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी एक गंभीर आरोप केला आहे. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंनी आंदोलनाला रसद पुरवल्याचा आरोप केलाय तसंच या पक्षाच्या आमदारांनी 10 ते 15 लाख रूपये आंदोलनासाठी दिल्याचा आरोपही हाकेंकडून करण्यात आलाय. तर हाकेंनी केलेले सर्व आरोप शरद पवारांनी फेटाळले आहेत. आमचा कवडीचा संबंध नाहीये, त्यामुळे त्याबाबत भाष्य नको असं ते म्हणाले आहेत.
जरांगे पाटलांच्या बेकायदा मागण्यांना शरद पवारांचाच पाठिंबा असल्याचा आरोप हाकेंनी केला आहे. शरद पवारांनी ओबीसी समाजाचं शोषण केल्याचा आरोपही हाकेंनी केला. तर कोण-कोणाच्या मागे हे सर्वांना कळलंय, त्यामुळे त्यावर पुन्हा वाद नको असं विधान प्रवीण दरेकरांनी केलं आहे.
जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन केलं. जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत मुंबई न सोडण्याचा इशारा जरांगेंनी दिला होता. यानंतर जरांगे पाटलांचा 8 पैकी 6 मागण्या पूर्ण करण्यात आल्यात. त्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर सरकारनं काढला. दरम्यान दबावाला बळी पडून सरकारनं हा निर्णय घेतल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.
हैदराबाद गॅझेटचा जीआर काढण्याचा अधिकार सरकारलाही नाही. या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागल्याची भावना हाकेंनी व्यक्त केलीय.. तर कुणबी नोंदी असणा-यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे, त्यामुळे ओबीसी समाजानं चिंता करू नये असं
आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर राज्यात चांगलंच राजकारण पेटलं. ओबीसी नेत्यांनी जीआरला विरोध करत तो रद्द करण्याची मागणी केलीय.. तसंच झी 24 तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमातून हाकेंनी दोन्ही पवार आणि ठाकरेंवर गंभीर आरोप देखील केले आहेत. त्यामुळे आरक्षणावरून सुरू असलेला हा वाद इथवरंच न थांबता आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
FAQ
1) लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबावर कोणता आरोप?
अजित पवारांचे आमदार मात्र जरांगे पाटलाला रसद, डिझेल, गाड्या, माणसं पुरवतात. शरद पवार जाऊन त्या बेकायदेशीर मागणीचं समर्थन करतात. रोहित पवारांची आयटी सेल रात्रंदिवस त्यांना मदत करते. तीच सगळी लोक मुंबईत येतात. मुंबईत आल्यानंतर सुप्रिया सुळेंपासून, बंडू जाधवापासून अंबादास दानवेंपर्यंत तिथे जाऊन बसतात. या माणसांना बेकायदा मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या बाबतीत काय घडू शकतं?.
2) उद्धव ठाकरेंवर काय आरोप केले?
“अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार हे सर्वजण रसद पुरवतात. मी फिल्डवर असून गावोगावी जातो. मला सांगितलेलं आहे. त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं आहे. बजरंग सोनावणेंची स्टेटमेंट समोर ठेवू शकतो. अजित पवारांचे आमदार विजय सोळंकी आणि विजयसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगेंसोबत असल्याचं सांगितलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
3) मराठा आंदोलकांना 10 लाख कोणी दिले?
“ते मुंबईपर्यंत कसे येतात? मुंबईपर्यंत गाड्या कशा येतात? त्यांच्या गाड्यांचा ताफा कुठून येतो? त्याला डिझेल कुठून येतं? मनोज जरांगे काय कारखानदाराचा, आमदार, खासदाराचा मुलगा आहे का? या सर्व गोष्टी हालतात कुठून? कार्यकर्ते तर यामागे आहेच पण एका एका आमदाराने 10 ते 15 लाख दिल्याची जनतेत चर्चा आहे”.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.