
रुग्णवाहिकेच्या चालकाचे नियंत्रण सुटून 1 महिला ठार, तर 6 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समृद्धी महामार्गावरील धामणगाव शिवारात शुक्रवारी पहाटे 4.30 च्या सुमारास घडली आहे.
.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त रुग्णवाहिका छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे एका बालकाला उपचारासाठी घेऊन जात होती. ही रुग्णवाहिका धामणगाव परिसरातील समृद्धी महामार्गावरील 605.2 मुंबई लेनवर आली असताना चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रुग्णवाहिका विरुद्ध बाजूच्या डिव्हायडरला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, डिव्हायडरला धडकल्यानंतर रुग्णवाहिका 4 ते 5 वेळा उलटली. त्यात रुग्णवाहिकेतील फेमिदबी रऊफ शेख (चौधरी) (55, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.
तर गुलाम अब्दुल खान (33, मुक्ताई नगर), रहेमान मोहम्मद शरीब खान (47, रा. नांदूर जि. बुलढाना) सोयल जाफर खान (28, रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी, रा. हरसूल जि. संभाजी नगर), अशोक पंडित पाटील (45 रा. जालना रोड जि. संभाजी नगर), भगवान संगीतकुमार इंगळे (35 रा. संभाजी नगर) यांच्यासह उपचारासाठी नेले जाणारे 5 दिवसीय लहान बालक जखमी झाले आहे. या सर्वांना जबर मुक्कामार लागला आहे.
पोलिसांनी जखमींना रुग्णालयात हलवले
स्थानिकांनी 112 वर कॉल करून या घटनेची घोटी पोलिस ठाणे ठाणे येथे माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने हवालदार सतीश शेलार, राजाराम डगळे, गुरुदेव मोरे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व जखमींना एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच जखमींच्या कुटुंबीयांनाही या घटनेची माहिती दिली.
5 फेब्रुवारीलाही झाला होता समृद्धीवर अपघात
उल्लेखनीय बाब म्हणजे समृद्धी महामार्गावरील हड्स पिंपळगाव शिवारात गत 5 फेब्रुवारी रोजी एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला होता. या घटनेत 2 जण ठार तर 5 जण जखमी झाले होते. या घटनेत रुग्णवाहिकेने एका अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली होती. ही रुग्णवाहिका नाशिक येथून बिहारच्या पाटणा येथील एम्स रुग्णालयाच्या दिशेने जात होती. पण रस्त्यातच तिचा अपघात झाला होता.
हे ही वाचा…
कोल्हापुरात कर्नाटकच्या एसटीची तोडफोड:इचलकरंजी येथील हुलगेश्वरी रोडवरील घटना; धुळवड खेळताना गोळा फेक, प्रवासी जखमी
कोल्हापूर – कोल्हापुरात कर्नाटकाच्या एसटी बसची तोडफोड करण्यात आली आहे. इचलकरंजीमध्ये धुळवड खेळताना हुलगेश्वरी रोडवर ही घटना घडली. या घटनेत काही प्रवासीही जखमी झाल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.