digital products downloads

सरकारकडून आता विद्यार्थीनींसाठी सर्वात मोठी घोषणा, 2026 आधीच बॅंक खात्यात येणार 2500 रुपये!

सरकारकडून आता विद्यार्थीनींसाठी सर्वात मोठी घोषणा, 2026 आधीच बॅंक खात्यात येणार 2500 रुपये!

Aapki Beti Scheme: महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना अतिशय प्रसिद्ध आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. सरकार विविध घटकांसाठी अशा योजना जाहीर करत असते. दरम्यान राजस्थान सरकारनेदेखील विद्यार्थीनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी खास योजना आणली आहे. याअंतर्गत विद्यार्थीनींच्या खात्यात दरमहा विशिष्ट रक्कम जमा होणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

राजस्थान सरकारने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी “आपकी बेटी योजना”सुरु केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना, विशेषतः ज्या कुटुंबात पालकांचे निधन झाले आहे किंवा बीपीएल (गरीबी रेषेखालील) श्रेणीतील असलेल्या मुलींसाठी ही योजना आहे. गरिबीमुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडणाऱ्या मुलींच्या ड्रॉपआऊट दर कमी करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. राजस्थान बालिका शिक्षा फाउंडेशनद्वारे ही योजना राबवली जाते. ज्यामध्ये सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलींना थेट आर्थिक सहायता मिळते. यामुळे कुटुंबावरील आर्थिक भार कमी होईल आणि मुली स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

पात्रता निकष काय?

या योजनेचा लाभ फक्त राजस्थानच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींनाच मिळेल. यासाठी विद्यार्थीनी राजस्थानची कायमस्वरूपी रहिवासी असावी, बीपीएल कुटुंबातील असावी आणि पालकांपैकी एक किंवा दोघांचेही निधन झाले असावे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलींना हा लाभ मिळू शकतो. पुरुष विद्यार्थी किंवा खासगी शाळेतील मुलींना या योजनेचा फायदा घेता येणार नाही.अर्जदाराने जन आधार कार्ड आणि बँक खाते जोडलेले असावे. याशिवाय आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि पालकांच्या मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास) आवश्यक आहेत. हे निकष पूर्ण न केल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो, याची विद्यार्थीनींनी नोंद घ्या. 

बँक खात्यात डीबीटी 

योजनेअंतर्गत आर्थिक सहायता इयत्तेनुसार दिली जाते. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलींना दरवर्षी ₹2100 ची मदत मिळेल, जी पुस्तके, शुल्क आणि इतर शिक्षण खर्चासाठी वापरता येईल. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या मुलींना ₹2500 ची रक्कम मिळेल, जी उच्च शिक्षणासाठी अधिक उपयुक्त ठरेल. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या जन आधार लिंक्ड बँक खात्यात डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे जमा केली जाते. यामुळे पारदर्शकता वाढते. रक्कम वर्षाला एकदा जमा केली जाते आणि ती मुलीच्या नावाने असते. ती रक्कम तिच्याच शिक्षणावरच खर्च व्हावी अशी अपेक्षा असते. 

कशी असेल अर्ज प्रक्रिया?

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असू सरकारी शाळांद्वारे राबवली जाते. विद्यार्थिनी किंवा  शाळा व्यवस्थापन “बेनिफिशरी स्कीम पोर्टल” किंवा राजशाला दर्पण पोर्टलवर (rajsanskrti.nic.in किंवा शालादर्पण.राज.nic.in) माहिती भरु शकतात. येथे  आधार, बँक पासबुक, जात/निवास प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 2025 साठी शाळांनी 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व माहिती ऑनलाइन सादर करावी, अशी अंतिम मुदत आहे. शिक्षण संचालनालय 30 नोव्हेंबरपर्यंत पडताळणी केली जाणार आहे. यात चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची नोंद घ्या. 

नवीन वर्षापूर्वीच मुलींना मदत 

पडताळणीनंतर रक्कम डिसेंबर 2025 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी 2026 मध्ये खात्यात जमा होईल. यामुळे नवीन वर्षापूर्वीच मुलींना मदत मिळणार आहे. उमेदवारांनी आपले जन आधार आणि बँक तपशील अपडेट ठेवण्याचे आवाहन करण्यात आलंय. राजस्थान बालिका शिक्षा फाउंडेशन आणि शिक्षण विभागाकडे या योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे. योजना यशस्वी करण्यासाठी शाळा आणि पालकांचा सहभाग आवश्यक आहे. ही योजना मुलींच्या साक्षरता दर वाढवण्यास आणि लिंग समानतेस मदत करणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट तपासावी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

FAQ

प्रश्न: राजस्थानच्या “आपकी बेटी योजने”चा लाभ कोणत्या मुलींना मिळेल?

उत्तर: हा लाभ फक्त राजस्थानच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींनाच मिळेल, ज्या बीपीएल (गरीबी रेषेखालील) कुटुंबातील आहेत किंवा ज्यांचे पालक दोघेही किंवा एकाचे निधन झाले आहे. खासगी शाळेतील मुली किंवा मुले या योजनेस पात्र नाहीत.

प्रश्न: योजनेत किती रुपये मिळतात आणि ते कोणत्या इयत्तेला मिळतात?

उत्तर: इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या मुलींना दरवर्षी ₹२,१०० मिळतील, तर इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या मुलींना ₹२,५०० मिळतील. ही रक्कम थेट मुलींच्या जन आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल.

प्रश्न: ही रक्कम खात्यात कधीपर्यंत जमा होईल आणि अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

उत्तर: शाळांनी २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सर्व मुलींची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरावी. पडताळणीनंतर डिसेंबर २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला रक्कम खात्यात जमा होईल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp