
ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई : सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अर्थात CERT-IN या संस्थेनं नागरिकांना अलर्ट दिला आहे. 16 अब्ज ऑनलाईन पासवर्डवर हॅकर्सनं दरोडा टाकल्याचं उघड झाल्यानंतर सरकारकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हॅकर्सचा धोका टाळण्यासाठी अकाऊंटचं युजरनेम आणि पासवर्ड बदलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.
तुम्ही ऑनलाईन बँकिंग ऍप वापरत असाल तर आत्ताच तुमच्या अकाऊंटचं युजरनेम आणि पासवर्ड बदला. कारण तुम्ही पासवर्ड बदलला नाहीतर तुमचं बँक खातं रिकामं होण्याची दाट शक्यता आहे. कारण जगातील जवळपास 16 अब्ज इंटरनेट वापरकर्त्यांचे बँक अकाऊंट आणि जीमेल अकाऊंटचे पासवर्ड सायबर चाचांच्या हाती पडलेत. हा सगळा चोरी झालेला डेटा डार्कवेबवर विक्रीसाठी उपलब्ध झालाय. या डेटाच्या आधारे बँक खाती साफ करण्याचं काम सायबर गुन्हेगारांनी सुरुही केलंय. काही लोकांनी ई-मेलचे पासवर्ड मिळवून गोपनीय खात्यांवरची संवेदनशील माहिती चोरली गेल्याची शक्यता आहे.
बँक खाती असो की ई-मेल अकाऊंट लोकं लक्षात राहिल असा पासवर्ड ठेवतात. मग सहज लक्षात राहिल असा पासवर्डचा शोध अगदी बाळबोध पासवर्डवर येऊन थांबतो
असे पासवर्ड सर्रास ठेवले जातात. साधारणतः स्वतःचं नाव, बायकोचं नाव, मुलांची नावं किंवा आईवडिलांची नावं पासवर्डसाठी ठेवली जातात. हॅकर्स कुटुंबाची माहिती काढून तुमचं बँक खात्याचा एक्सेस सहज मिळवू शकतो. आतापर्यंत तुम्ही असे सोपे पासवर्ड ठेवले असतील तर ते बदलून टाका नाहीतर पश्चाताप करण्याशिवाय तुमच्याकडं दुसरा कोणताच मार्ग शिल्लक राहणार नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.