
पाशवी बहुमत मिळाल्यामुळे लोकशाहीवर बलात्कार करण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आहे, असे सरकारला वाटत असल्याचे टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जितेंद्र आव्हाड यां
.
सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलिस कोठडीत होऊनही कोणावरही कारवाई झालेली नाही. या सरकारला गरिबांची जाण नाही का? मग त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात उपस्थित केला. राज्य सरकारने सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचे कारण सांगावे. मात्र, सरकार बेशरमपणे पोलिसांच्या पाठीशी उभे राहत आहे. या सरकारला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा तळतळाट सहन करावा लागेल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एखाद्या सरकारला पाशवी बहुमत मिळते तेव्हा पाशवी बलात्कार होत असतात. हे सहन करण्याची ताकद तुम्ही ठेवा. विरोधी पक्षाला काही किंमत द्यायची नाही, म्हणून सभागृहात समोर कोण बसत नाही. त्याच्या हातात हातकड्या असताना त्यांनी पिस्तुल खेचण्याचा प्रयत्न कसा केला? पीएसआय अधिकारी आतमध्ये बसतो. जर असे एन्काउंटर होणार असतील तर न्यायपालिकेचे महत्त्व काय? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केला. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलिस कोठडीत झाला. मात्र, कोणावरही कारवाई झाली नाही. सरकार बेशरमपणे पोलिसांच्या मागे उभे राहत आहे, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात बोलताना केला.
फोटो समोर आले नसते, तर मुंडेंचा राजीनामा झाला नसता
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना संतोष देशमुख हत्या प्रकरणावरूनही सरकारवर निशाणा साधला. संतोष देशमुख यांची हत्या झाली. जोपर्यंत फोटो समोर येत नव्हते, तोपर्यंत कारवाई होत नव्हती. फोटो कसे बाहेर आले, यावर मला बोलायचे नाही. फोटो समोर आले नसते तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला नसता, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केली. शंभर जण सांभाळण्यापेक्षा वाल्मीक कराडला सांभाळा तुम्हाला त्रास होणार नाही, असे सुदर्शन घुले कंपनीला सांगतो. एक वाल्मिक कराड बीडमध्ये आहे. मात्र, असे अनेक वाल्मीक प्रत्येक जिल्ह्यात आहे. अरे तुम्हाला तो आंधळे सापडत नाही. प्रशांत कोरटकर तुमच्या नजरेखालून दुबईला पळून जातो आणि तुम्ही एआय इंटलिजन्सच्या बाता मारता, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला सुनावले.
आव्हाडांकडून राजापूरच्या घटनेचा सभागृहात उल्लेख
जितेंद्र आव्हाड यांनी राजापूरमधील दर्गा जाळपोळ घटनेचा देखील उल्लेख केला. ज्या राजापूरने यापूर्वी कधीही हिंदू- मुसलमान वाद बघितला नाही. त्याच राजापूरमध्ये चार जण जाऊन दर्गा जाळतात. एक मंत्री उठतात, बाहेर जातात आणि आग लावण्याचा प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री आणि कॅबिनेट काहीच बोलत नाही. कॅबिनेट मंत्र्यांची जबाबदारी ही फक्त कॅबिनेटपुरती मर्यादित असते की बाहेरही गेल्यावर त्यांची तीच जबाबदारी असते. मग शपथ कशाला घेता? असा सवाल आव्हाड यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, कधी औरंजेबावरून आग लागते, तर कधी हलाल की झटका… हे सर्व बंद करा, महाराष्ट्र जाळू नका. महाराष्ट्राला जाळून राख करून टाकाल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.