digital products downloads

सर्वाधिक ट्रॅफिक जॅम ते 14 लेनचा रस्ता… असा आहे मुंबईजवळचा 5200 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! तपशील पाहाच

सर्वाधिक ट्रॅफिक जॅम ते 14 लेनचा रस्ता… असा आहे मुंबईजवळचा 5200 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! तपशील पाहाच

Mumbai Infrastructure News: मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेला घोडबंदर रोड लवकरच कात टाकणार आहे. घोडबंदर रोडचा विस्तारचा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या नव्या प्रकल्पामुळे मुंबई, ठाण्याबरोबरच मीरा रोड आणि अगदी गुजरातवरुन येणारी-जाणारी वाहतूक अधिक वेगवान होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) घोडबंदरच्या रस्त्याचे रुंदीकरण करणार असून 7+7 असा एकूण 14 लेनचा हा मार्ग होणार आहे. या रस्त्याची नवी रचना 14 लेन असलेल्या काँक्रीट कॉरिडॉरमध्ये करण्याची योजना एमएमआरडीए आखत आहे. सदर प्रकल्पासाठी 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दररोजच्या प्रवाशांची गर्दी विशेषत पिक अवर्समध्ये गर्दी कमी करण्याचं या अपग्रेडेशनचं उद्दिष्ट आहे. घोडबंदरचा विस्तार झाला तर त्याचा फायदा शहर सध्या सुरु असलेल्या वाहतूक सुधारणांना देखील हा मार्ग अधिक पूरक ठरेल.

Add Zee News as a Preferred Source

रस्ते आणि रेल्वे मार्गाची गरज

एमएमआरडीएचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी ठाण्यातील वाहतूक आव्हानांना तोंड देणं महत्त्वाचं असल्याचं सांगत आपला मोर्चा ठाण्यातील वाहतुककोंडीवर उपाय शोधण्याकडे वळवला आहे. “एमएमआरच्या सर्वात गतिमान आणि वेगाने वाढणाऱ्या भागांपैकी ठाणे हा एक आहे” असं मुखर्जी म्हणावे असल्याचं वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे. तसेच रस्ते आणि रेल्वे दोन्ही उपायांची आवश्यकता ही वाहतुककोंडी सोडवण्यासाठी आवश्यक असल्याचे मुखर्जी यांनी सांगितलं आहे. 

पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रयत्नांचा भाग

घोडबंदर रोड प्रकल्प हा ठाण्यासाठीच्या 5200 कोटी रुपयांच्या विस्तृत पायाभूत सुविधा योजनेचा एक भाग आहे. 14-लेन कॉरिडॉरसह, एमएमआरडीए 700 कोटी रुपयांचे 23 अंतर्गत रस्ते देखील विकसित करत असल्याचे वृत्त आहे. 1800 कोटी रुपयांचा उन्नत 3+3 पदरी मार्गाचं कामही सुरु झालं आहे हा मार्ग आनंद नगर-साकेत रस्ता, शहराच्या बायपास म्हणून काम करेल, ज्यामुळे स्थानिक रस्त्यांवरील वाहतूककोंडी कमी होईल.

कोस्टल रोड घोडबंदरला पर्याय

आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे 2200 कोटी रुपयांचा ठाणे कोस्टल रोड प्रोजेक्ट! घोडबंदर रोडला समांतर पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कोस्टल रोडच्या माध्यमातून तयार होणार आहे. “एकत्रितपणे, या उपाययोजनांमुळे स्थानिक वाहतूक सुरळीत होईल, ठाण्यातून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणारी आणि येणारी वाहतूक जलद होईल आणि ठाण्यातील गर्दीवर कायमस्वरूपी उपाय होईल,” असे मुखर्जी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले.

मेट्रोला पाठिंबा

घोडबंदर रोडचा विस्तार देखील बांधकामाधीन मेट्रो मार्गांसोबत होणार आहे. मेट्रो मार्ग 4, 4 ए आणि 5 उच्च-क्षमतेचे भव्य ट्रान्झिट प्रदान करतील अशी अपेक्षा आहे. हे सारे मार्ग एकदा कार्यान्वित झाल्यानंतर घोडबंदर कॉरिडॉरवरील वाहतूक भार आणखी कमी करण्यास मदत होणार आहे.

याव्यतिरिक्त, एमएमआरडीए ठाणे येथे वाहतूक सिम्युलेशन अभ्यास करत आहे. या माध्यमातून गर्दी व्यवस्थापनासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना आखता येणार आहेत. या अभ्यासांचे उद्दिष्ट शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारताना वाहतुकीचे पर्याय ऑप्टिमायझ करणे आणि विलंब कमी करण्याचं आहे.

बांधकाम अडथळा कमी करणे

रुंदीकरण केलेल्या कॉरिडॉरचे बांधकाम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांना कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा यासाठी इतर चालू पायाभूत सुविधांच्या विकासासोबत समन्वय साधला जात आहे, अशी माहिती मुखर्जी यांनी दिली. रस्ते रुंदीकरण, नवीन बायपास आणि सुधारित सार्वजनिक वाहतुकीचे संयोजन कायमचे अडथळे दूर करण्यासाठी आणि ठाण्याच्या जलद शहरी विकासाला पाठबळ देण्यासाठी आहे.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp