
देवतारी त्याला कोण मारी.. नशीब बल्लवत्तर म्हणून गॅलरीतून पडून देखील सव्वा वर्षाचा चिमुकला चमत्कारिकरीत्या बचावला आहे. हा सगळा प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे.
कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील घटना. सव्वा वर्षांचा श्रीवंश प्रविण लव्हटे असं बचावलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. केवळ नशीब बल्लवत्तर म्हणून सव्वा वर्षाचा श्रीवंश प्रविण लव्हटे गॅलरीतून पडून देखील चमत्कारिकरीत्या बचावला आहे.
नवसाच्या श्रीवंशला कुटूंबाने फुलासारखा जपला आहे. पण रविवारी लव्हटे कुटूंबासाठी काळ बनून आलेली वेळ, नशिब बल्लवत्तर म्हणूनच माघारी परतल्याने लव्हटे कुंटूबाने देवाचे अक्षरशः आभार मानले आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
कोतोली येथील प्रविण पांडूरंग लव्हटे यांचा सव्वा वर्षाचा श्रीवंश हा एकुलता मुलगा घराच्या गॅलरीत खेळत होता.बहिणीची नजर चुकवून खाली डोकावल्याने तो गँलरीतून खाली कोसळला. दरम्यान ही घटना प्रत्यक्षपणे पहाणार्यांचा यावेळी अक्षरशा थरकापचं उडाला.
दैव बलवत्तर म्हणून श्रीवंशच्या डोक्याला किरकोळ दुखापत वगळता तो सुखरूप बचावल्याने देवतारी त्याला कोण मारी म्हणीचा नागरीकांना प्रत्यय आला. अचानक घडलेल्या प्रसंगाने आई जयश्री अक्षरशा भांबावून गेली. त्यामुळे घरच्यांनी बाळाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात श्रीवंशचे एक्स-रे आणि स्कॅनिंगसह सर्व तपासण्या करण्यात आल्या. बाळाची तब्बेत चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगताच आई-वडिलांसह सर्व नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी तरळले.
नेमकं काय घडलं?
श्रीवंश त्याच्या बहिणीसोबत पहिल्या मजल्यावर होता. बहिणीची नजर चुकवून श्रीवंश गॅलरीत पुढे सरकला. आणि काही क्षणातच तो खाली कोसळला. श्रीवंश खाली कोसळताच शेजारच्या काकांनी त्याला उचलला. हा सगळा प्रकार काही क्षणातच घडल्यामुळे श्रीवंश आई आणि त्याचे बाबा घाबरले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



