
प्रत्येकाची काम करण्याची एक वेगळी पद्धत असते. सशक्त लोकशाहीमध्ये दोन्ही बाजूने संवाद असलाच पाहिजे. बोलण्यात काहीच गैर आहे असे मला वाटत नाही, आम्ही राजकारण अन् सामाजकारण यात गल्लत करत नाही, असे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ज
.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, परवा जेव्हा आरोप-प्रत्यारोप झाले तेव्हा मी संजय राऊत यांनी भेटून आले. आमची संपूर्ण टीम ताकदीने शिवसेनेसोबत उभी राहिली आहे. वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटमधील भेट ही काय नवीन नाही. राष्ट्रवादीचेच लोकं भेटतात असे नाही, भाजप, काँग्रेसचे लोकंही भेटत असतात, सर्वच पक्षाचे लोक एकमेकांना भेटतात.
शुगर इंस्टीट्यूटमध्ये राजकारण नाही
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये असतानाही बैठकीला येत होते. आमचे जे सामाजिक, शैक्षणिक काम आहे ते आणि राजकारण हे वेगवेगळे आहे. आम्ही दोन्ही गोष्टीमध्ये गल्लत करत नाही. संसदेच्या अधिवेशन काळात मी नेहमी मंत्र्यांच्या भेटीला जात असते. कारण मतदारसंघातील अनेक कामांबद्दल चर्चा करावी लागते. वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटमध्ये सर्वच पक्षाचे लोकं आहेत. अनेक वर्षांची पद्धत आहे की साखर, उद्योग, शेतकरी यांच्यावर चर्चा होत असते. तिथे कोणतीही विचार धारा, पक्ष यासंदर्भात चर्चा होत नाही. एआयचा उपयोग शेतीसाठी किंवा साखर उद्योगासाठी करता येईल का यासाठी आजचे चर्चासत्र आहे असे माझ्या वाचण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
ईडीने नोटीस पाठवलेले किती भाजप अन् मित्रपक्षात
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण हे बातम्या पाहिले के जाणवतेच. हा डेटा काय माझा नाही, तो सरकारचाच डेटा आहे. राज्य सरकारने हे म्हटले आहे. राज्यात आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात क्राइम रेट वाढला नाही. ज्याच्यावर आरोप होतो तो व्यक्ती देशसोडून जातो. गेल्या 10 वर्षांमध्ये ईडी आणि सीबीआयच्या 196 जणांना नोटीस पाठवल्या यात 2 जणांवर आरोप सिद्ध झाले. आता उरलेल्या लोकांमध्ये किती जण राजकीय पक्षाचे नेते त्यातील किती भाजप आणि मित्रपक्षात किती याची यादी भाजप सरकारने दिली पाहिजे.
हे सरकार असंवेदनशील
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे सरकार असंवेदनशील आहे. त्यांनी ना सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली ना संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली ना महादेव मुंडेंच्या पत्नीची भेट घेतली. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहण्यासाठी यांच्याकडे वेळच नाही. शरद पवारांनी 3 महिन्यापूर्वी सांगितलेली गोष्ट आता खरी ठरत आहे. आम्हाला या विषयात राजकारण आणत नाही. पण जर आरोपी सापडत नसतील तर आपण काय बोलणार.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.