digital products downloads

सांगळूदकर महाविद्यालयाला विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार: 5 वर्षांतील वृक्षारोपण, संवर्धन, स्वच्छतेची दखल – Amravati News

सांगळूदकर महाविद्यालयाला विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार:  5 वर्षांतील वृक्षारोपण, संवर्धन, स्वच्छतेची दखल – Amravati News



संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाला पर्यावरण पुरस्कार प्रदान केला आहे. गेल्या पाच वर्षांतील वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान आणि जनजागृती अशा विविध उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे महाविद्यालयाची पालक संस्था असलेल्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे नावही उत्कृष्टतेच्या यादीत समाविष्ट झाले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पर्यावरण पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्याच हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महाविद्यालय विकास व शाळा समितीचे सदस्य डॉ. वसंत टाले, शेषराव काळे, शिवाजी देशमुख, प्रा. प्रभाकर कोलखेडे, नरेशचंद्र लढ्ढा तथा प्रभाकर कोरपे उपस्थित होते. २०१९ ते २०२३ या पाच वर्षांत महाविद्यालयाने पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन, समाज जनजागृती आणि स्वच्छ भारत अभियान यांसारखे उपक्रम सातत्याने राबवले. या कालावधीत सुमारे ४०७० वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात आले. तसेच, रोपवाटिका स्थापन करून विद्यार्थ्यांना बीज निवड व रोप संगोपनाचे प्रशिक्षण देण्यात आले. महाविद्यालयाने दरवर्षी मातीचे गणपती बनविणे, स्वच्छता मोहिम, हागणदारी मुक्त अभियान, कोविड जनजागृती, “वृक्ष दिंडी” आणि “चंद्रभागा आपल्या दारी” यांसारखे जनजागृतीपर उपक्रम राबवले. प्लास्टिकमुक्त परिसर, कागदी पिशव्यांचे वितरण, नैसर्गिक रंग निर्मिती आणि जनजागृती रॅली यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रचार केला. गांडूळ खत निर्मिती व घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणीही करण्यात आली. महाविद्यालयात १० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यरत असून दरवर्षी सुमारे १४,४०० युनिट वीज निर्मिती होते. ऊर्जा व हरित अंकेक्षण, ई-कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि “वृक्ष दत्तक” योजना सातत्याने राबविण्यात येते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तथा संपूर्ण कार्यकारणी, आजीवन सभासद यांनी महाविद्यालयाचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाच्या १३ एकराच्या निसर्गरम्य परिसरात चार उद्याने विकसित करण्यात आली आहेत, ज्यात औषधी वनस्पती उद्यान विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरत आहे. महाविद्यालयातील कोळी संशोधन केंद्राच्या माध्यमातून २२ नव्या कोळ्यांच्या प्रजातींचा शोध घेण्यात आला आहे. “बोलके झाड” या अभिनव उपक्रमांतर्गत अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून झाडांविषयी माहिती देण्याची संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली. वन्यजीव सप्ताह, व्याघ्र दिन, चिमणी दिन, ग्रीन रक्षाबंधन आणि पृथ्वी तास यानिमित्त जनजागृती कार्यक्रमही येथे आयोजित केले जातात.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp