digital products downloads

सांगोल्यात दहावीच्या पेपर चोरीचा छडा: विद्यार्थ्यानेच टाकला होता प्रश्नपत्रिकांवर डल्ला; अभ्यास न झाल्याने चोरल्याची कबुली – Solapur News

सांगोल्यात दहावीच्या पेपर चोरीचा छडा:  विद्यार्थ्यानेच टाकला होता प्रश्नपत्रिकांवर डल्ला; अभ्यास न झाल्याने चोरल्याची कबुली – Solapur News



सांगोला येथील सांगोला विद्यामंदिर शाळेतून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या दहावीच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका शोधण्यात पोलिसांना अखेर यश आले असून, याप्रकरणी त्याच केंद्रावर परीक्षा देणाऱ्या एका विधी संघर्ष ग्रस्त अल्पवयीन विद्यार्थ्याचा धक्कादायक सहभाग उघड झाला आहे. विशेष म्हणजे, हे कृत्य करणारा विद्यार्थी स्वतः दहावीत शिकत असून आज भूगोलाचा पेपर दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या शोधमोहिमेचा आज असा नाट्यमयरीत्या शेवट झाला असून, या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भूगोलाचा पुरेसा अभ्यास झाला नसल्यामुळे या विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिका चोरी केल्याची कबुली पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. आपल्या पालकांसमोर दिलेल्या जबाबात त्याने सांगितले की, चोरी करण्यापूर्वी त्याने केंद्रावरील स्ट्रॉंग रूमची पद्धतशीर पाहणी केली होती आणि त्यानंतर पहाटे दोनच्या सुमारास इलेक्ट्रिक बाईकवर इलेक्ट्रिक कटर घेऊन तो शाळेत पोहोचला. कटरच्या साहाय्याने कुलूप तोडून त्याने भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांचे दोन गठ्ठे आणि तीन कोऱ्या उत्तरपत्रिका लंपास केल्या. घरी पोहोचल्यावर त्याने त्यातील एक गठ्ठा फोडून प्रश्नपत्रिकाही पाहिली होती, अशी धक्कादायक माहिती या तपासातून समोर आली आहे. सांगोला पोलिसांनी आज या विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन विद्यार्थ्याकडून चोरीला गेलेल्या 50 प्रश्नपत्रिका, 3 कोऱ्या उत्तरपत्रिका, इलेक्ट्रिक कटर आणि गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक बाईक हस्तगत केली आहे. या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि राज्यात मोठी खळबळ उडाली होती. काल याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आजचा पेपर होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र शिक्षण मंडळाने रात्री उशिरा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानुसार, आज राज्यातील सर्व केंद्रांवर दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर सुरळीतपणे पार पडला. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत असे समोर आले आहे की, प्रश्नपत्रिका चोरणाऱ्या या विद्यार्थ्याने त्याचा इतर कोणाशीही शेअर करून गैरवापर केला नव्हता, ही प्रशासनासाठी मोठी दिलासादायक बाब ठरली. केवळ स्वतःचा अभ्यास झाला नसल्याच्या कारणातून त्याने हे कृत्य केले होते. आता कायदेशीर प्रक्रियेनुसार या विधी संघर्षग्रस्त बालकास उद्या बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणाच्या यशस्वी तपासामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अनिश्चिततेवर अखेर पडदा पडला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp