
सातारा तालुक्यातील दिव्यनगरी रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी जोरदार कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. ३ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी दोन जणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी डीवायएसपी राजीव नवले यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या ठिकाणावरून ३ लाख ६७ हजार ५२० रुपयांचा ऐवज जप्त केला. या छाप्यावेळी परराज्यातील दोन महिला व एक महाराष्ट्रातील महिला अशा तीन महिला वेश्या व्यवसायासाठी आणल्या होत्या. त्याप्रकरणी शुभम विलास कल्याणकर वय २३ रा. स्वप्नशिल्प हौसिंग होसायटी मांजरी ता. हवेली पुणे, आदित्य संजय मोहिते वय २४ रा. आंबेदरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या ठिकाणाहून १५00 रुपये रोख रक्कम व १५ हजार रुपये रोख रक्कम व १५ हजार रुपयांचा मोबाईल, ३ लाख रुपयांच स्वीप्ट कार, ५0 हजार रुपयांचा आयफोन, १ हजार रुपयांचा साधा फोन असा एकूण ३ लाख ६७ हजार ५२0 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक निलेश तांबे करत आहेत. दोन वाईन शॉप फोडून ८ लाखांवर डल्ला सातारा शहरातील तांदूळआळी परिसरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत दोन वाईन शॉप फोडून ८ लाख १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. याबाबतचा गुन्हा शाहुपूरी पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ३ रोजी रात्री ते ४ एप्रिलच्या पहाटे दरम्यान ही चोरी झाली. ओम गणेश वाडक याच्या फिर्यादीनुसार तांदूळ आळी येथे सरोज वाईन्स नावाचे दारुचे दुकान आहे. त्या दारूच्या दुकानात चोरट्यांनी तिजोरी व काउंटरच्या ड्राव्हरमधील १0 हजा रुपये मागील काउंटच्या ड्रॉव्हरमधील १५ हजार रुपये, तसेच चारुदत्त सुभाष बागल याच्या राधिका वाईन या दारुच्या दुकानतील पुढच्या काउंटरच्या कप्यातील ३0 हजार रुपये असा सुमारे ८ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक डेरे करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.




