digital products downloads

सातारा क्राइम: ‘ॲपल’च्या बनावट साहित्याचा मोठा साठा जप्त, 19 लाखांच्या मुद्देमालासह 4 जणांवर गुन्हा दाखल – Kolhapur News

सातारा क्राइम:  ‘ॲपल’च्या बनावट साहित्याचा मोठा साठा जप्त, 19 लाखांच्या मुद्देमालासह 4 जणांवर गुन्हा दाखल – Kolhapur News



सातारा शहरातील छ.शाहू स्टेडियम तसेच एसटी स्टँड समोरील मोबाईलच्या दुकानात अँपल कंपनीची बनावट ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या ४ दुकानदारांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण १८ लाख ९५ हजार ५०० रुपये किमतीचा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे . याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मोबाईल ॲक्सेसरीज चा बनावट माल उत्पादन करून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना समजल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी शाहू स्टेडियम आणि एसटी स्टँड परिसरातील मोबाईल ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा टाकला.यावेळी त्यांच्याकडे अँपल कंपनीकडील कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना अँपल कंपनीचे चार्जर, अडँप्टर, चार्जर केबल, एअरपॅड, मोबाईल बॅक कव्हर, बॅक पॅनल, बॅटरी स्ट्रीप, कॅमेरा लेन्स इत्यादी अँपल कंपनीचे उत्पादनाचे हुबेहूब नक्कल रंगसंगती असलेली बनावट आर्टिस्टिक अँपल लोगो असलेली व कोणतेही मालकी हक्काचा कायदेशीर अधिकार नसलेली एकूण १८ लाख ९५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमालाचा साठा करून होलसेल आणि किरकोळ स्वरूपात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करताना पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी रोहित अशोक चोरगे (वय ३० वर्ष राहणार खिंडवाडी,सातारा) अजित रघुनाथ साबळे (वय ३३ वर्ष) दिनेश भगवानराम माळी (वय ४० वर्ष राहणार भुरके कॉलनी, सदर बाजार सातारा) दिनेश कुमार चौधरी (वय ३३ वर्ष राहणार शाहूपुरी सातारा) यांच्या विरोधात कुंदन गुलाबराव बेलोशी (वय ३८ वर्ष राहणार कल्याण पूर्ण, मुंबई) यांनी फिर्याद दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करत आहेत. गोडोली शाहूनगर येथून बांधकामाच्या साहित्याची चोरी गोडोली शाहूनगर येथे बांधकामाच्या स्लॅबच्या ४२ हजार ५०० रुपये किमतीच्या लोखंडी प्लेटा अज्ञात चोरट्याने दिनांक २२ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास चोरून नेल्या असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे मल्लेश अर्जुन वसकोटी (वय ३६ राहणार सदर बाजार समाज कल्याण ऑफिस शेजारी सातारा) यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करत आहेत. राधिका रोड भोसले मळा येथून दुचाकीची चोरी राधिका रोड भोसले मळा येथील तुकाराम हाइट्स अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये उभी केलेली २५ हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकल क्रमांक (एम. एच ११ सी.एन ३३३५) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. ३१ जानेवारी रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान दुचाकीची चोरी करण्यात आली असल्याची फिर्याद रामदास लक्ष्मण माने (वय ३५ राहणार तुकाराम हाइट्स राधिका रोड भोसले मळा सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार इष्टे करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp