
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बचा शोध घेताना बॉम्बशोधक-नाशक पथक
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयईडी बॉम्ब ठेवण्यात आला असल्याच्या धमकीचा ईमेल बुधवारी दुपारी मिळताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती कळवताच बॉम्ब शोधक, नाशक पथक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांन
.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आयईडी बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी तातडीने पोलिसांना लेखी खबर दिली. त्यानंतर काही वेळातच बॉम्ब शोधक, नाशक पथक (बीडीएस), श्वान पथकासह दाखल झाले. पहिल्यांदा सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली. त्यानंतर बीडीएस पथकाने श्वानाद्वारे तपासणी केली. मात्र, कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आली नाही. सध्या इमारतीला पोलिसांचा वेढा असून संपूर्ण कार्यालयाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेली धमकी ही साताऱ्यातील प्रशासकीय पातळीवरची पहिलीच घटना आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या धमकीचा ईमेल कोणत्याही शासकीय कार्यालयाला आलेला नाही. दरम्यान, श्वान पथक, बीडीएस पथक आणि मोठ्या प्रमाणात पोलिस जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यामुळे नेमके काय घडले, हेच कर्मचाऱ्यांना कळत नव्हते. सुरूवातीला हे मॉकड्रिल असल्याचा त्यांचा समज झाला होता. मात्र, धमकीचा ईमेल आला असल्याचे कळताच कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉबने उडवून देण्याच्या संदर्भात आलेला ई-मेल
आयईडी (इंप्रोव्हाईझ्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाईस) या स्फोटकाला सुधारीत किंवा अपग्रेड करता येते. या स्फोटकापासून लहान पाईप बॉम्बपासून ते मोठी हानी पोहचविणारा बॉम्ब तयार केला जाऊ शकतो. एका बटणाद्वारे स्फोटकाला ॲक्टीव्ह करता येते. मुख्य चार्ज, पॉवर सोर्स आणि कंटेनर, याचा आयईडी स्फोटकात समावेश असतो. अमोनियम नायट्रेट, गन पावडर, हायड्रोजन पॅरॉक्साइडद्वारे आयईडी बॉम्ब बनवला जातो. हा बॉम्ब हाताळणे सोपे असते. बॅगमधून नेता येतो किंवा एखाद्या जागी सहज लपवता येऊ शकतो.

सातारचे अप्पर जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी पोलिस अधीक्षकांना बॉम्ब संदर्भात आलेल्या मेलची माहिती देऊन चौकशी करण्याचे कळवले
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.