digital products downloads

सातारा जिल्हा परिषद राड्याला नवे वळण: ‘माझे अपहरण झालेच नाही’, दिनकर शिंदेंचा पोलिसांत खुलासा; शंभूराज देसाई धक्काबुक्की प्रकरण – Kolhapur News

सातारा जिल्हा परिषद राड्याला नवे वळण:  ‘माझे अपहरण झालेच नाही’, दिनकर शिंदेंचा पोलिसांत खुलासा; शंभूराज देसाई धक्काबुक्की प्रकरण – Kolhapur News



सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटले असतानाच, या प्रकरणातील केंद्रस्थानी असलेले सदस्य दिनकर शिंदे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले आहेत. त्यांच्या अपहरणाचा दावा करत शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या समर्थकांची पोलिसांशी मोठी बाचाबाची झाली होती. मात्र, आता दिनकर शिंदे यांनी ‘माझे अपहरण झालेच नव्हते’ असा धक्कादायक खुलासा केल्याने सातारा पोलिसांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या निवेदनानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. निवडणुकीदरम्यान पोलिसांकडून झालेली धक्काबुक्की आणि मारहाण या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी आक्रमक झाले असतानाच, राष्ट्रवादीचे सदस्य दिनकर शिंदे यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या जबाबानंतर संपूर्ण प्रकरणाला एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार नितीन पाटील जबाब नोंदवताना उपस्थित सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी ज्यांच्या कथित अपहरणावरून मोठा राडा झाला, ते राष्ट्रवादीचे सदस्य बापू उर्फ दिनकर शिंदे आज सातारा स्थानिक गुन्हे शाखेमध्ये आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार नितीन पाटील हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे, दिनकर शिंदे यांनी माझे अपहरण झालेच नव्हते, असा पुनरुच्चार करत यापूर्वीच वाई पोलिस ठाण्यात आपली भूमिका स्पष्ट केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या उपस्थितीत आता त्यांचा अधिकृत जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. शंभूराज देसाईंना धक्काबुक्की झाली होती याच कथित अपहरण प्रकरणावरून पोलिसांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना ताब्यात घेतले होते. याच गोंधळात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दोन दिवसांनंतर आता खुद्द शिंदे यांनीच अपहरणाचे वृत्त फेटाळल्याने, त्या दिवशी झालेली पोलिस कारवाई आणि मंत्र्यांशी झालेली झटापट यावरून सातारा प्रशासमोरील अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp