
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले आहेत. माजी खासदार रणजित निंबाळकर, त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सचिन कांबळे हे तिघे मिळून फलटणमधी
.
अंबादास दानवे म्हणाले, फलटण आत्महत्या प्रकरणातील युवतीवर राजकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांचा दबाव होता. महाडिक नावाच्या पोलिस निरीक्षकाचा त्यामध्ये समावेश आहे. त्याची 15 दिवसांपूर्वी नंदुरबारला बदली झाली आहे. त्याच्याकडे सदर डॉक्टर तरुणीचा तक्रार अर्ज आला होता. मात्र त्याने त्या तक्रारीला केराची टोपली दाखवली. त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा. त्याने त्याचवेळी सदर अर्जाची दखल घेतली असती तर आज तिचा जीव वाचला असता.
माजी खासदाराचा भाऊ यंत्रणा चालवतो
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, माजी खासदाराचा भाऊ अभिजीत निंबाळकर हा त्या ठिकाणी यंत्रणा चालवतो. अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, त्यांना चुकीची कामे करायला लावणे हे धंदे करतो. त्याला साथ राष्ट्रवादीच्या सचिन कांबळे पाटील या आमदाराची आहे. त्या निंबाळकरच अधिकारांच्या दालनात काय काम असतं? या तिघांवर कारवाई करा. हे तिघे त्याठिकाणी यंत्रणा चालवत होते आणि चुकीची कामे करत होते.
सचिन कांबळे पाटील हे अजित पवारांचे आमदार नाहीत, ते नावाला राष्ट्रवादीत आहेत. ते सगळे काम भाजपचे करतात असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. ते म्हणाले की, आमदार सचिन कांबळे पाटील, माजी खासदार रणजित निंबाळकर आणि त्यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर हे अधिकाऱ्यावर दबाव टाकतात आणि चुकीची कामे करायला लावतात. पोस्ट मार्टम सर्टिफिकेट त्यांच्या सोयीने द्या, चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करा, राजकीय कार्यकर्त्यांवर चुकीची कलमे लावा असले उद्योग करत होते, असा आरोप दानवे यांनी केला आहे.
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, या तिघांनी वाठार निंबाळकर वाखरी येथे उत्खनन केलेले नसताना देखील एका शेतकऱ्यावर एक कोटी रुपयांचा बोजा चढवला आहे. याला जबाबदार कोण? रणजित निंबाळकरांनी शरद पवारांची राष्ट्रवादी, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि आमच्या शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यावर चुकीच्या प्रकारे गुन्हे दाखल केले आहेत, असाही आरोप दानवेंनी केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



