
Satara News: साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे. एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे. आश्चर्याची बाब अशी की याच मातेने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता. त्यामुळे या मातेच्या कुशीत आत्ता सात बाळे विसरणार आहेत. मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे. कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या 27 वर्षीय तरुणीने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला. त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळांचं सख लाभलं आहे.
गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळांच्या हास्याने घर खुलणार आहे. अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत. या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली
एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळाच पाहायला मिळाला.
FAQ
1) ही घटना कधी घडली?
ही घटना १४ सप्टेंबर २०२५ रोजी घडली, ज्यामुळे जिल्हा रुग्णालयात आनंदसोहळाच साजरा झाला.
2. अशा दुर्मीळ प्रसूतीचे वैद्यकीय कारण काय असू शकते?
अशी दुर्मीळ प्रसूती सामान्यतः एका ओव्हरीमधून एकापेक्षा जास्त अंड्यांचे निषेचन होणे किंवा IVF सारख्या उपचारांमुळे होऊ शकते. मात्र, या प्रकरणात वैद्यकीय तपशील उपलब्ध नसल्याने निश्चित सांगता येत नाही.
3. या घटनेचे महत्त्व काय?
ही घटना वैद्यकीय दृष्टिकोनातून दुर्मीळ असून, जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या यशाचे उदाहरण आहे. यामुळे स्थानिक पातळीवर आरोग्यसेवेची क्षमता दाखवली गेली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.