
Satara News : सातारा…. पश्चिम महाराष्ट्रातील एक निसर्गसंपन्न जिल्हा. गडकिल्ल्यांपासून घाटवाटा आणि डोंगरमाथा, यांसह पठारं आणि वनसंपदा लाभलेल्या या जिल्ह्याला महाराष्ट्राच्या इतिहासातही अढळ स्थान आहे. हाच जिल्हा सध्या तेथील एका अनपेक्षित घटनेमुळं चर्चेत आला आहे. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून, एका व्हिडीओच्या माध्यमातून ती समोर आली आहे.
साताऱ्यात ज्वालामुखीचा उद्रेक?
जगभरात विविध ठिकाणी आजही अनेक जिवंत ज्वालामुखी असून, त्यांचा उद्रेक झाल्याचं वृत्त समोर आल्याचं पाहायला मिळतं. मात्र आता थेट साताऱ्यातूनच तत्सम दृश्य समोर आल्या कारणानं सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. पण सध्या एकच प्रश्न पडतोय, तो म्हणजे साताऱ्यात खरंच ज्वालामुखीचा उद्रेक झाला?
तर, या प्रश्नाचं उत्तर तसं नकारात्मक आहे. कारण प्रत्यक्षात व्हिडीओ पाहताना हा ज्वालामुखीचा उद्रेक वाटत असला तरीही ही निसर्गाची अजब किमयाच आहे. राज्यात सध्या पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी झालं असल्यानं सूर्यास्ताच्या आणि सूर्योदयाच्या वेळी सर्वत्र रंगीबेरंगी ढगांचा खेळ पहायला मिळत आहे. साताऱ्यातील प्रसिद्ध छायाचित्रकार धीरज झंवर यांनी यवतेश्वर डोंगररांगांवर सुरू असणाऱ्या लाल बुंद ढगांचा खेळ चित्रित केला आहे. सूर्य प्रकाश आणि ढगांचा खेळ एक वेगळीच अनुभूती देणारा ठरला. ज्यामुळे डोंगररांगातून जणू ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे याचाच आभास आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ज्याप्रमाणे धुर आणि राखेचा स्फोट होऊन लोटच्या लोट बाहेर पडतात, त्याचप्रमाणे आभाळात पाहताना जणू गडद डोंगररांगांमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचा आभास हा व्हिडीओ पाहताना झाला.
कुठे आहे यवतेश्वर डोंगररांग?
साताऱ्यात पर्यटकांना खुणावणारी अनेक ठिकाणं असून, यवतेश्वरही त्यातलंच एक नाव. हे इथं डोंगराच्या कुशीत दडलेलं आणि निसर्गाच्या सानिध्ध्यात वसलेलं एक गाव, यादवकालीन शंभू महादेवाच्या मंदिरामुळं आणि त्याशेजारी असणाऱ्या काळभैरवाच्या देवस्थानामुळं यवतेश्वर या ठिकाणाकडे पर्यटकांचा कल दिसून येतो. समुद्रसपाटीपासून यवतेश्वर डोंगराची उंची 1230 मीटर इतकी आहे. पावसाळ्यासह हिवाळ्यातसुद्धा यवतेश्वर डोंगरासह त्याच्या आजुबाजूचा निसर्ग अनेकांना खुणावत असतो आणि याचदरम्यान या निसर्गाच्या अगाध लीला पाहण्याची संधी मिळते.
FAQ
साताऱ्यात ज्वालामुखीचा उद्रेक झाला का?
नाही, साताऱ्यात ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नाही. हा एक निसर्गाचा जादू आहे. राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी रंगीबेरंगी ढगांचा खेळ होतोय. यवतेश्वर डोंगररांगांवर लाल बुंद ढगांचा खेळ पाहायला मिळाला, ज्यामुळे जणू धुर आणि राखेचा स्फोट होत असल्याचा आभास होतो.
हा व्हिडीओ काय दाखवतो आणि तो कसा व्हायरल झाला?
व्हिडीओत यवतेश्वर डोंगररांगांमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्यासारखे दिसते, जणू ज्वालामुखीचा उद्रेक. प्रत्यक्षात हा सूर्यप्रकाश आणि ढगांचा खेळ आहे, ज्याने डोंगररांगांना ज्वालामुखीचे रूप दिले.
यवतेश्वर डोंगररांग कुठे आहे आणि काय खास आहे?
यवतेश्वर हे सातारा जिल्ह्यातील एक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ आहे. डोंगराच्या कुशीत दडलेले हे गाव यादवकालीन शंभू महादेव मंदिर आणि काळभैरव देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.