digital products downloads

सातुर्णा फ्लॅटमध्ये देहविक्रीचा भंडाफोड: रॅकेट चालवणाऱ्या महिलेसह चार जणांना अटक – Amravati News

सातुर्णा फ्लॅटमध्ये देहविक्रीचा भंडाफोड:  रॅकेट चालवणाऱ्या महिलेसह चार जणांना अटक – Amravati News



अमरावती शहर गुन्हे शाखेने बुधवारी सातुर्णा एमआयडीसी परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेसह दोन तरुणी आणि दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरात अवैध देहविक्रीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले होते. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज दुपारी ही धाडसी कारवाई केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिलांगण रोडवरील सातुर्णा एमआयडीसी परिसरातील एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये हा देहव्यवसाय सुरू होता. पथकाने खात्री करून छापा टाकला असता, तेथे हा गैरप्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले. या छाप्यात रॅकेट चालवणाऱ्या मुख्य महिलेसह दोन युवती आणि दोन पुरुष ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी रॅकेट चालवणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp