
GenS Life ने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनवण्याच्या वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सायबरशी भागीदारी केली आहे. GenS Life हे तुमच्या वयाच्या साठीच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयुक्त असे एक ऍप आहे. ज्येष्ठ नागरिकांना जीवनाचा परिपूर्ण अनुभव घेता यावा यासाठी त्यांना सक्षम बनवणारा हा एक टेक्नॉलॉजी- सक्षम आणि आकर्षक प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्र सायबरने नमूद केले आहे की सायबर गुन्ह्यांच्या दररोज 5000 तक्रारी नोंदल्या जातात.
याचा अर्थ दर मिनिटाला 4 सायबर गुन्हे घडत आहेत. सध्या सगळ्यात जास्त आढळणारा घोटाळा म्हणजे ‘डिजिटल अरेस्ट’, ज्यामध्ये गुन्हेगार स्वतः कायदा अंमलबजावणी अधिकारी असल्याचे सांगून आणि कायदेशीर कार्यवाहीच्या धमक्या देऊन वृद्धांकडून पैसे उकळतात.
ज्येष्ठ मंडळींना लक्ष्य करून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे आणि एकीकडे नवीन टेक्नॉलॉजी विकसित होत आहे. आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, सुरक्षा आणि डिजिटल धमक्यांविरुद्ध जागरूकता निर्माण करणे हे फार महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्र सायबरचे पोलीस महाउपनिरिक्षक श्री. संजय शिंत्रे यांनी GenS Life सोबत बोलताना ज्येष्ठ नागरिक कसे फसवणुकीला सहज बळी पडू शकतात यावर प्रकाश टाकताना म्हटले, “भारतात 15 कोटींपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे डिजिटल ज्ञान मर्यादित असते आणि आर्थिक
संपत्तीपर्यंत पोहोच असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना सायबर गुन्ह्यांसाठी प्रामुख्याने लक्ष्य बनवले जाते. डिजिटल अरेस्टच्या बाबतीत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, कोणतेही सरकारी खाते किंवा पोलीस, विमानतळ, कस्टम्स, इन्कम टॅक्स, CBI, क्राइम ब्रांच, CID, ED सारख्या कायदा
अंमलबजावणी एजन्सी कधीही व्हिडिओ कॉल मार्फत चौकशी करत नाहीत.”
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या सक्रिय उपाययोजनांवर भर देत श्री. शिंत्रे म्हणाले, “या वाढत चाललेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खास सायबर गुन्हे हाताळणारी केंद्रे स्थापित केली आहेत. ही भारतातील एक अशी व्यवस्था आहे, जेथे गुन्ह्याला बळी पडणारा माणूस आमच्या
हेल्पलाइन नंबरमार्फत 24 तासात केव्हाही गुन्हा नोंदवू शकतो. या वाढत्या घोटाळ्यांविषयीचे मार्गदर्शन सतत प्रकाशित करून आम्ही नागरिकांना सतर्क राहण्याची विनंती करत आहोत. आम्ही एक समर्पित प्लॅटफॉर्म विकसित केला आहे, जेथे बळी पडलेली व्यक्ती तक्रार नोंदवून तत्काळ तपास सुरू करवू शकते.” ते पुढे म्हणाले, “जेव्हा जेव्हा पेमेंट करण्याची डेडलाइन दिली जाते तेव्हा नेहमीच तो सायबर गुन्हा असू शकतो, हे ध्यानात ठेवा.”
या गुन्ह्यांचा सामना करताना काय करावे याबद्दल सल्ला देताना श्री. शिंत्रे म्हणाले, “सायबर गुन्हेगार सतत आपल्या पद्धती बदलत आहेत. त्यामुळे जागरूकता ही बचावाची पहिली पायरी आहे. भारत सरकारने 26 लाखांपेक्षा जास्त बनावट मोबाइल नंबर ब्लॉक केले आहेत, जे सायबर गुन्ह्याविरुद्धच्या लढ्यातील एक लक्षणीय पाऊल आहे. ज्येष्ठ नागरिकांना अधिकृत मार्गदर्शिकांची माहिती असली पाहिजे, त्यांनी आपले मोबाइल सुरक्षित ठेवून डिजिटल स्वच्छता राखली पाहजे आणि अज्ञात कॉल आणि मेसेज नेहमी तपासून घेतले पाहिजेत. काहीही संशयास्पद वाटल्यास कुटुंबातील एखाद्या विश्वासू माणसाशी बोलावे किंवा आमच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा. आपण एकत्र मिळून या धोक्यांवर मात करू शकतो.”
या वाढत्या धोक्याविषयी टिप्पणी करताना GenS Life च्या संस्थापिका मीनाक्षी मेनन म्हणाल्या, “आपल्या ज्येष्ठांना केवळ सहानुभूतीचीच नाही, तर चांगल्या आणि स्मार्ट सुरक्षेची देखील आवश्यकता आहे. GenS Life मध्ये आम्ही विम्याची शिक्षण आणि मदतीशी सांगड घालून हे सुनिश्चित
करण्याचा प्रयत्न करत आहोत की, ज्येष्ठांना ऑनलाइन व्यवहार करताना सुरक्षित वाटेल आणि आत्मविश्वास वाटेल. आजच्या डिजिटल युगात परिपूर्ण जीवन जगण्यासाठी त्यांना सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे. आम्हाला वाटते की वयाच्या साठीनंतर आपल्या मर्जीने जीवन जगता यायला हवे.
त्यांच्या भावनिक, आर्थिक, जीवनशैलीविषयक आणि सामाजिक गरजा पूर्ण करणारी सर्वांगीण ईकोसिस्टम उभारण्याच्या आमच्या व्यापक मिशनशी हे सुसंगत आहे.”
ज्येष्ठांना सायबर धोक्यांचा वेळोवेळी सामना करावा लागतो, त्यावर उपाययोजना करताना GenS Life ने खास आपल्या गोल्ड प्लानच्या सदस्यांसाठी सायबर इन्शुरन्स लॉन्च केला आहे, जो फसवणुकीमुळे होणारे नुकसान कव्हर करतो तसेच सोपी सुरक्षा मार्गदर्शिका, संवादात्मक जागरूकता
सत्रे आणि 24 तास सेवा प्रदान करतो. 4900 रु. च्या वार्षिक प्रीमियम सह हा गोल्ड प्लान 5 लाख रु. पर्यंत सायबर इन्शुरन्स प्रदान करतो. याशिवाय त्यात हॉस्पि-कॅश, व्यक्तिगत अपघात विमा, खास किफायतशीर सेवा यांचा लाभ देखील
आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.